प्ले ऑफ च्या स्पर्धेतून csk आणि kkr बाहेर
मुंबई | चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्समधील सामन्यात चेन्नईने विजय मिळवला. त्यामुळे कोलकाताच्या उरल्या सुरल्या आशेवर पाणी फेरलं. चेन्नईचा संघ प्लेऑफच्या फेरीतून बाहेर पडला आहे. मात्र कोलकाताने विजय मिळवला असता तर त्यांनीही प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी होती.
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सर रविंद्र जडेजाने गगनचुंबी षटकार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केलं. एकवेळ 12 चेंडूत 30 धावांची गरज चेन्नईला होती. मात्र जडेजा आणि सॅम करन यांनी जारदार फटकेबाजी करत विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता संघाने 173 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. यामध्ये सलामीला उतरलेल्या नितीश राणाने अर्धशतक ठोकत 87 धावांची दमदार खेळी केली.
त्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये दिनेश कार्तिकने 10 चेंडूत 21 धावा केल्या.
दरम्यान, चेन्नईची सुरूवात खराब झाली. वॉटसन लवकर बाद झाला त्यानंतर सलामीवीर गायकवाड आणि अंबाती रायडूने चांगली भागिदीरी केली. यामध्ये गायकवाडने 72 धावा ठोकल्या तर रायडूने जलद फलंदाजी करत 20 चेंडूत 38 धावा केल्या.
Be First to Comment