कागदांच्या नोटापायी
ज्या मातीस्न आला
त्या मातीला इसरला
सांग मानवा तुझा
होईल कसा भला
विकून जमीनीचा तुकडा
उभे केले टावर
गर्दी तरी संपना
कसा घालशील आवर
विहीरी , तलाव पाण्याचे
झरे बुजवले सारे
निसर्गाचे अता उलटे
वाहू लागले वारे
संथ वाहणारी माई
तुला दिसली न्हाई
निर्माल्य केर कचरा
केला तू ठाई ठाई
दर्याच्या राजाला बी
मागं हटवित गेलास
निसर्गाचं सारं चक्र
संपवत निघालास
पक्षांचा किलबिलाट
नाहीसा तू केला
बिचाऱ्या मैनेला
पिंजऱ्यात अडकवला
गरीबांच्या मानगुटी
बसून काम केला
दिलास का रे त्यांना
त्यांचा खरा मोबदला
डोंगर केले सपाट
झाडांची काट छाट
विचारांचा तुझा
सारा मजला मोकाट
कागदांच्या नोटापायी
सारं हरवून बसला
आज शरीराहून मनाने
तू जास्तच जरा थकला
संगीता थोरात, नवीन पनवेल







Be First to Comment