Press "Enter" to skip to content

पेण नगरपालिकेच्या समोर भाजपची जाहीर सभा

तटकरे यांनी चालवलेले सुडाचे राजकारण भाजप खपवून घेणार नाही : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔶🔷🔶

सत्तेचा गैर वापर करुन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दमबाजी करित खसदार सुनिल तटकरे यांनी चालवलेले सुडाचे राजकारण रायगड जिल्ह्यात भाजप खपवुन घेणार नसुन जशास तसे उत्तर देण्याची ताकद भाजप ठेवत असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पेण येथे केले.

पेण नगरपालिकेत मुख्याधिकारी व गटनेते यांच्यात झालेल्या वादामुळे मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी तटकरे यांच्या दबावाखाली येऊन गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्या विरोधात पेण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने प्रशासन व तटकरे यांनी चालविलेल्या सत्तेच्या गैरवापराच्या निषेधार्थ आज पेण नगरपालिकेच्या समोर जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेला माजी पालकमंत्री तथा आ. रविंद चव्हाण,आ.प्रशांत ठाकूर, आ.निरंजन डावखरे, आ.रविशेठ पाटील, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, गटनेते परेश ठाकूर,भाजप जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते पेण नगराध्यक्षा प्रितम पाटील, जिल्हा सरचिटणीस बंडु खंडागळे, मिलिंद पाटील,भास्कर पाटील आदिंसह भाजपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले कि, गटनेते यांनी सभागृहात कोणताही गंभीर गुन्हा न करता पोलिसांनी याबाबत आमदारांच्या घराची झाडाझडती घेतली हि बाब अतिशय निंदनिय आहे अशीच झाडाझडती सुतारवाडीची करणार काय? तटकरे यांनी जिल्ह्यातील भगवा सुद्धा कमी केला असल्याने मुख्यमंत्री याकडे लक्ष देतील का ? तटकरे हे भस्मासुर असुन त्यांनी अनेक पक्ष खावुन टाकले आहेत या प्रकरणाबाबत आपण विधिमंडळात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विकासाचे राजकारण न करता दडपशाहिचे राजकारण करण्यात तटकरे यांचा हातखंडा असल्याने लोकशाहीच्या अधिकाराची ही पायमल्ली करत असल्याचे सांगुन गटनेते यांच्यावर लावण्यात आलेल्या गुन्हयांची वरिष्ठ पोलिस प्रशासनाने चौकशी करावी व त्यांना १६९ गुन्हे अंतर्गत रद्द करण्यात यावा तसेच शासनाने येथील प्रशासन अधिकारी यांची तातडीने बदली करण्यात यावी अशी मागणी यावेळी माजी पालकमंत्री तथा आ. रविंद्र चव्हाण यांनी केली.

यावेळी आ.रविशेठ पाटील म्हणाले की, पेण आम्ही नगरपालिकेमध्ये जनतेच्या हिताची कामे करत आहोत मात्र तटकरे यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत असुन ते त्यांना कधी ही जमणार नाही. आगरी भाषा हि आमची मायबोली भाषा आहे त्यामुळे तटकरे यांनी तिचा अवमान करुन अन्यथा तंगड्या तोडून हातात दिल्या जातील असा सज्जड दम त्यांनी दिला खा. सुनिल तटकरे यांनी जिल्ह्यातील शेकापक्ष सुद्धा संपवून टाकला आहे मात्र भाजपा हा दमदार पक्ष असल्याचे पाटील यांनी सांगितले.

यावेळी प्रितम पाटिल,जगदीश गायकवाड,महेश मोहिते आदिंची भाषणे झाली तर कोणताही अनुचित प्रकार घडु नये या करता मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या निषेध मोर्चा करीता पेण शहरातील व्यापा-यांनी दुकाने बंद मध्ये ठेवली होती.

पेण नगरपालिकेचे गटनेते अनिरुद्ध पाटील यांचा मुबंई उच्च न्यायालयाने जामिन मंजूर केल्याचे यावेळी सभे मध्ये जाहीर करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.