Press "Enter" to skip to content

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ युनियनच्या नामफलकाचे अनावरण

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔷🔶🔷

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (आरएमबिके एस) युनीट मेसर्सं न्यु ट्रान्सइंडिया लॅाजिस्टीक प्रायव्हेट लिमिटेड( ॲाल कारगो) या संघटनेची स्थापना झाली असून युनियनच्या नामफलक बोर्डाचे अनावरण व उद्घाटन सोहळा मेसर्स कामगार नेते आणि राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मंचारी संघाचे उपाध्यक्ष संतोष घरत यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी कर्मंचारी संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, कॅान्टिनेंटल कंपनी युनिट कार्याध्यक्ष अच्युत ठाकुर, सचिव वासुदेव ठाकूर, प्रशांत ठाकूर, बहुजन क्रांती मोर्चा उरण संयोजक अक्षय ठाकूर आदींसह कामगार उपस्थित होते.

दरम्यान कंपनीने कामगारांना त्रास दिला तर संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीने भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी। असा इशारा आरएमबिकेएस जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील यांनी दिला.
कामगार वर्गांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ कटिबद्ध असून आम्ही कामगारांना न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.

कामगारांना पगार वाढ असो, बोनस, निवृत्ती नंतर वरसांना नोकरी असो अशा समस्या उदभवल्या तर कंपनी विरोधात राज्य पातलीवर आंदोलन छेडले जाईल.स्थानिक कामगार म्हणजे कंपनीचा कणा आहे. उद्या कोणाचे बरे वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी कंपनीचे प्रशासन जबाबदार राहील यांची कपंनी प्रशासनाने नोंद घ्यावी. असे प्रतिपादन कामगार नेते, राज्य उपाध्यक्ष संतोषभाई घरत यांनी केले.यावेली कंपनीतील ६४ पैकी ५६ कामगारांनी युनियनचे सदस्यत्व स्वीकारले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.