Press "Enter" to skip to content

चिल्हे चे ग्राम दैवत धाक्सुद महाराजांचा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा

पालखी सोहळा भाविकांसाठी नजर भेट 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷

रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे ग्रामस्थांचे आराध्य ग्रामदैवत धाक्सुद महाराजांचा नवरात्र उत्सव यावेळी कोरोना संकटामुळे शासनाच्या नियम अटी शर्थीनुसार येथील ग्रामस्थांना साधेपणाने केला साजरा तर पालखी सोहळा ग्रामदैवताची नजरभेट म्हणून सोशल डिस्टनचा पालन करून केवळ दर्शन देत येथील ग्रामस्थांनी अति दक्षतेने केला साजरा.

यावेळी येथील ग्रामस्थ व महिला अतिशय परिश्रम घेऊन मंदिरा सभोतील व गावातील प्लास्टिकमुक्त प्रतिज्ञा घेत स्वच्छता केली येथे नवरात्र उत्सवात मंदिरातील ग्रामदेवतासह मूर्तींना वस्त्र व मुखवटे दाग दागिने घालून सजविण्यात आले तसेच दररोज येथील ग्रामस्थांनी दरवोज कोरोना संकट म्हणून दक्षतेत गावातील ग्रामस्थ नागरिकांनी सोशल डिस्टनचा वापर करत ग्रामदैवताची पूजा आरती व धार्मिक कार्यक्रम मंदिरात सकाळी काकडाआरती सायंकाळी हरिपाठ भजन करण्यात आले.

१७ ऑक्टोबर ते २६ ऑक्टो या कालावधीत संपन्न झालेल्या नवरात्रोत्सव काळातील सालाबादप्रमाणे यावर्षी ग्राम दैवत श्री धाक्सुद महाराजांचा पालखी सोहळा शांततेत व केवळ ग्राम दैवताची नजरभेट म्हणून लांबून दर्शन देत हा पालखी सोहळा साजरा केला .

प्रशासकीय बरोबरच कोलाड विभागीय पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे यांनी ग्रामस्थ नागरिकांना दिलेल्या सूचनांचे पालन करत हा नवरात्रोत्सव व पालखी सोहळा साजरा केला .गावचे पोलीस पाटील गणेश महाडिक,गाव कमिटीचे अध्यक्ष सुधीर लोखंडे ,उपाध्यक्ष रमेश महाडिक,सेक्रेटरी तुकाराम महाडिक, खजिनदार अनंत लोखंडे, सुरेश महाडिक,गजानन जंगम, उपसरपंच सौ मानसी लोखंडे,सदस्या सौ रिया लोखंडे, सदस्य व माजी सरपंच शांताराम महाडिक,हभप नारायण लोखंडे,महादेव महाडिक,सहदेव महाडिक,ज्ञानेश्वर लोखंडे, तुकाराम महाडिक,राम भाऊ लोखंडे, धनाजी महाडिक,सुनील महाडिक,प्रवीण घायले, गणपत शिंदे,धनाजी लोखंडे,तसेच देवाचे पुजारी काशिराम घायले व मारुती शिंदे,यांच्या नेतृत्वाखाली नियंत्रणाखाली हा उत्सव संपन्न झाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.