सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी विधेयक कायद्या विरोधात देशभारतातील शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली असून हा कायदा लागू करून केंद्र सरकारने देशातील शेतकरी वर्गावर अन्याय केलेला आहे. या कायद्याचा गावोगावी निषेध व्यक्त करण्यात येत आहे याची रोहा तालुका काँग्रेसने दाखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या कायदया विरोधात काँग्रेस रोहा तालुका अध्यक्ष निजामभाई सय्यद व रोहा नगरपालिकेचे नगरसेवक समीर सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या कायद्या विरोधात शेतकरी वर्गाच्या सह्यांची मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली आहे.
रोहा येथे सह्यांची मोहीम राबवितांना
काँग्रेस रोहा तालुका अध्यक्ष निजामभाई सय्यद, नगरसेवक समीर सकपाळ, जिल्हा उपाध्यक्ष सुनील देशमुख, बाळू साळवी, रोहा शहर अध्यक्ष मीतेश कल्याणी, माजी नगरसेवक अल्ताफ चोरडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच निजामभाई सय्यद यांनी नागोठणे विभागातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन फाॅर्म भरून सह्यांची मोहीम राबवली.
त्यावेळी काँग्रेसचे नागोठणे शहर अध्यक्ष अशपाक पानसरे, सरफराज शिंदि उपस्थित होते.








Be First to Comment