सिटी बेल लाइव्ह । खांब/रोहा । नंदकुमार मरवडे । 🔷🔶🔷
रोहा तालुक्यातील वरसे ग्राम पंचायत हद्दीतील वर्धमान रेसिडेन्सी येथे अश्विन शुद्ध दशमी दसऱ्याच्या साडे तीन मुहूर्ताच्या निमित्ताने शुभ तिथिवर कोविड – १९ चे सर्व नियमांचे काटेकोरपणे पाळन करीत वर्धमान बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि वर्धमान रेसिडेन्सी रहिवासी संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्री गणेश मंदिरामध्ये गणपती मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहोळा मोठ्या आनंदाने व उत्साहाने संपन्न झाला.
विजया दशमी दसरा आणि मंगळवार दि.२६ ऑक्टोंबर २०२० रोजी च्या शुभ मुहूर्तावर दोन दिवसीय विविध अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अश्विन शुद्ध दशमी दसऱ्याच्या साडे तीन मुहूर्ताच्या शुभ तिथिवर वर्धमान बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि वर्धमान रेसिडेन्सी रहिवासी संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्री गणेश मंदिरामध्ये गणपती मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहोळा श्री क्षेत्र बल्लाळेश्वर देवस्थान पाली येथील सचिन सुधीर साठे,विनय मराठे, संदिप शिधोरे, हर्षद जोशी – चौल आठवले- रोहा पुरौहितांच्या साहाय्याने अभिषेक व मंत्रोपचारणे वर्धमान बिल्डर्स अँड डीव्हलोपर्स चे मालक सुरेश शेठ घेवरचंद जैन आणि वर्धमान रेसिडेन्सी रहिवासी सभासद मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी उप सभापती अनिल भाऊ भगत,रायगड भूषण हभप गुरुवर्य बाळाराम महाराज शेळके,हभप.ज्ञानेश्वर लोखंडे आदींच्या शुभ हस्ते सर्व भाविक गणेश भक्तां प्रमुख उपस्थिती मध्ये कोरोना महामारी चे वाढते प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनेप्रमाणे शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून घालून दिलेल्या प्रचलित नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून श्री.गणपती मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहोळा सर्व रहिवासी सभासदांच्या तन,मन, धनाच्या सर्वोतपरी सहकार्याने व महत्त्वपूर्ण मोलाचे योगदानाने साजरा करण्यात आले.
क
ार्यक्रम यशस्वीतेसाठी वर्धमान रेसिडेन्सी रहिवासी संकुल चे अध्यक्ष दयानंद टिकोणे,मनोज दांडेकर,केशव म्हस्के,सोमनाथ देशमुख,सुशांत ठाकूर,महेंद्र थिटे,रविंद्र भगत,प्रशांत मढवी,गणपत पवार,अजय गायकवाड सर,प्रशांत दरेकर,महेंद्र देवरूसकर सर,प्रज्योत लोखंडे, वासुदेव मोहिते विनायक घरत मामा,गणेश लब्दे,आदी वर्धमान रेसिडेन्सी रहिवासी संकुल चे सर्व रहिवासी सभासद पुरुष वर्ग व महिला मंडळ,जेष्ठ नागरिक,बाळ – गोपाळ यांनी अथक परिश्रम घेतले..








Be First to Comment