Press "Enter" to skip to content

५३ वर्षाची दसरा स्नेहसंमेलनाची परंपरा आजही कायम : आ.अनिकेत तटकरे


सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷

गेल्या ५३ वर्षापासून दसरा स्नेहसंमेलन सुतारवाडी येथे साजरा केला जातो. खासदार सुनिल तटकरे यांचे वडील कै. दत्ताजीराव गणपत तटकरे आणि स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब रसाळ यांनी १९६७ वर्षांपूर्वी या ठिकाणी दसरा स्नेह संमेलनाची परंपरा सुरु केली. ती परंपरा आज तगायत तटकरे कुटुंबीयांनी अखंडपणे चालू ठेवली आहे.

दसरा स्नेहसंमेलन आणि गोविंदा हे सण दोन विभूतींनी सुरू केल्यापासून आजही एवढी वर्ष लोटली तरी सुतारवाडी नाक्यावर त्याच जोमाने ही परंपरा चालू आहे. खासदार सुनिल तटकरे हे कोठेही असले तरी गोविंदा आणि दसरा स्नेहसंमेलन कधीच चुकवत नाहीत. दरवर्षी येरळ ग्रामपंचायतीमधील बापूसाहेब रसाळ सभागृह दसरा या दिवशी पूर्णपणे हाउसफुल्ल असतो.

या वर्षी कोरोनामुळे सोशल डिस्टन चे नियम पाळून तोंडाला मास्क लावून ग्रामस्थ दसरा स्नेहसंमेलनासाठी उपस्थित होते. आमदार अनिकेत तटकरे यांचे सुतारवाडी येथे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचे स्वागत करण्यात आले. सुरुवातीपासून दसरा स्नेहसंमेलनात पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित राहून खासदार सुनिल तटकरे यांच्या समवेत आपट्याच्या पानांचे सोन लुटण या पारंपरिक कार्यक्रमात सहभागी होत असतात. या वर्षी काही अपवादात्मक परिस्थिती मुळे खासदार सुनिल तटकरे येऊ शकले नाही परंतु त्यांचे मन इथे असल्याचे आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, गेल्या 53 वर्षाचा इतिहास सर्वांना माहीत आहे. मी इथे आहे तो आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, मला सर्वांच्या आशीर्वादामुळे विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली तर आदिती ताईला राज्य सभेवर काम करण्याची संधी मिळाली. आज या ठिकाणी पाच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य येथे येऊन कार्यक्रमात सहभागी होतात पाचही ग्रामपंचायतीने चांगल्या प्रकारे भूमिका बजावली म्हणून या पंचक्रोशीतील कोरोना हद्दपार होण्यास भाग पडले. या कार्यक्रमामुळे जुनी पिढी आणि नवीन पुढे एकत्र येते.

पूर्वी आपण घरी जाऊन आपट्याच्या पानांचे सोने लुटत होतो. आता मात्र मोबाईलमुळे मेसेजद्वारे शुभेच्छा पाठविल्या जातात. येथील पाच ग्रामपंचायती वर सरपंच म्हणून महिलाराज आहे. त्यांनी पदावर असो वा नसो हा कार्यक्रम दरवर्षी चुकवू नये. या कार्यक्रमास जयप्रकाश रसाळ यांना चालता येत नसले तरी इतरांचा आधार घेऊन ते इथपर्यंत पोहोचले. त्यांचा आदर्श आणि विचार इतरांना घेणे आवश्यक आहे. या दिवशी एकमेकांच्या भेटी घेऊन प्रेमाचे प्रतिक म्हणून हा कार्यक्रम असतो. मात्र यावर्षी कोरोनामुळे मास्क लावणे आणि आपट्याच्या पानाचे सोन दिल्यानंतर किंवा पुष्पगुच्छ दिल्यानंतर सॅनिटायझर लावावे लागत आहे. या वर्षी कोरोनामुळे गरबा-दांडिया हा कार्यक्रम जरी होऊ शकला नाही तरी तरुण-तरुणींनी नाउमेद न होता आपल्या जीवाची काळजी घ्या.

पुढील वर्षी गरबा नृत्य जोमाने खेळा असे सांगून सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या नंतर पारंपरिक पद्धतीने सोनं लुटण हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास सरपंच सौ. विमल दळवी, माजी सभापती मोतीराम तेलंगे, आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे, तानाजी जाधव, जयप्रकाश रसाळ, रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे, नारायण धनवी, येरळ उपसरपंच सर्व सदस्य त्याचप्रमाणे पहूर सरपंच, उपसरपंच, सदस्य, जामगाव सरपंच, कुडली सरपंच, नेहरूनगर सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्वांनी डिस्टन्स तसेच मास्कचा वापर केला होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.