सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷
सहाय्यक नियंञक-वैधमापन शास्ञ खात्याने वजन काटे तपासणी करताना दिरंगाई करू नये. त्यामुळे ग्राहकांचे होणारे नुकसान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. वजन काटे रिपेरिंग परवाने धारकांच्या हातात सर्व अधिकार देऊ नका अन्यथा गाठ शिवसेनेशी असल्याचा इशारा शिवसेना संरक्षण कक्षातर्फे देण्यात आला आहे.
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे सहाय्यक नियंञक-वैधमापन कार्यालयात या संदर्भात निवेदन देऊन,अनेक विषयावर चर्चा केली. यावेळी कक्ष जिल्हाप्रमुख प्रमुख रमेश म्हाञे, उपजिल्हाप्रमुख विजय बोरकर, उपजिल्हाप्रमुख पेण शहरप्रमुख नरेश सोनावणे, रोहा कक्षउपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर खामकर ,संरपच अजित अमृसकर व तक्रारदार ग्राहक आदी उपस्थित होते.








Be First to Comment