Press "Enter" to skip to content

सतीश कळंबे यांची रायगड
वारकरी संगीत विभाग प्रमुखपदी नियुक्ती

सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । 🔶🔷🔶

तालुक्यातील उमरठ येथील सुपुत्र गायनाचार्य ह.भ.प.सतीश बाबूराव कळंबे यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या रायगड जिल्हा वारकरी संगीत विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले यांनी दिले आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह.भ.प. अनिल महाराज वाळके यांनी ह.भ.प.सतीश बाबूराव कळंबे यांची शिफारस केल्यावरून ही नियुक्ती केल्याचे या नियुक्तीपत्रामध्ये नमूद केले आहे.

पोलादपूर तालुक्यातील वडील बाबूराव कळंबे आणि चुलते रायगडभूषण महादेवमहाराज कळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या केवळ पाचव्या वर्षी संगीतसाधना सुरू करणाऱ्या ह.भ.प.सतीश कळंबे यांचे सध्या मुंबई घाटकोपर येथे वास्तव्य असून गेल्या 40 वर्षांपासून ते पारमार्थिक संगीतसेवा करीत आहेत. या काळात ह.भ.प. सतीश कळंबे यांनी मारूतीबुवा बागडे, कल्याणजी गायकवाड आणि कृष्णराव गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताचे धडे गिरविले असून संपूर्ण महाराष्ट्रभर पारमार्थिक संगीतसेवा केली आहे.

ह.भ.प. सतीश कळंबे यांनी शिर्डी माझे पंढरपूर ही कॅसेट आणि मायबाप व्हिडीओसीडी तसेच पंढरपूरचा वारकरी सीडी आदी स्वतच्या आवाजातील संगीतसेवा प्रसिध्द केली असून त्यांच्या या नियुक्तीबद्दल पोलादपूर तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील पारमार्थिक संगीत क्षेत्रात विशेष आनंद व्यक्त केला जात आहे. आगामी तीन वर्षे अथवा अध्यक्षांच्या पुढील आदेशापर्यंत यापैकी आधी जे असेल, तोपर्यंत ही नियुक्ती असेल, असे या नियुक्तीपत्रात राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले यांनी स्पष्ट केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.