Press "Enter" to skip to content

उरणमध्ये आज २३ कोरोना पॉजेटीव्ह : एकाचा मृत्यू


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू)

कोरोना कोविड १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून आज २३ जण पॉजेटीव्ह आढळले तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आजचा पॉजेटीव्हचा आकडा मोठा आल्याने उरणच्या जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.
उरणमध्ये आज उरण ३, नवघर १, करंजा ८, जसखार १, जेएनपीटी २, केगाव १, चिरनेर १, जासई २, फुंडे १, विंधणे १, धुतूम २ असे एकूण २३ जण पॉजेटीव्ही आढळले आहेत. तर एका पेशंटचा ऑक्सिजन अभावी झालेली अवेहलना झाल्यामुळे प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला आहे .
आज एकूण पॉजेटीव्ह ३४०, बरे झालेले २३६, उपचार घेणारे ९८ तर मयत ६ झाले असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
उरणमध्ये दोन दिवस पडलेल्या पावसामुळे वातावरणात बदल होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आज एका दिवसात २३ पॉजेटीव्ह व एकाचा मृत्यू झाल्याने उरणकर भीतीच्या सावटाखाली आहेत. प्रशासनाने पॉजेटीव्हचा वाढत चाललेला आकडा कमी करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा उरणकरांची हालत गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.