Press "Enter" to skip to content

भारतीय मजदूर संघाची प्रांत कार्यालय पनवेल येथे जोरदार निदर्शने


सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷

भारतीय मजदूर संघ रायगड जिल्हा यांच्या वतीने केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणा विरुद्ध कामगार विरोधी केंद्र सरकारच्या पार्लमेंटमध्ये जे कायदे केले आहेत. त्याच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

या निदर्शनास जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटील, सेक्रेटरी रमेश गोविलकर , कोकण संघटक अनिल डुमणे,बापू धडक, मोहन येणुरे,जे.एन.पी.टी.चे माजी विस्वस्थ रवी पाटील, कामगार नेते सुधीर घरत, रवी नाईक, मोतीलाल कोळी, श्रीधर लहाने असे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी प्रांत कार्यालया समोर जोरदार निदर्शने करण्यात आली. कामगार संघटनेच्या मागण्या मान्य केल्या नाही तर उग्र आंदोलन केले जाईल असे अशी घोषणा बाजी करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.