रिलायन्सने कुहिरे ग्रामपंचायत हद्दितील ग्रामस्थांना मूलभूत सुविधा द्याव्यात – सरपंच सौ. प्रज्ञा जवके 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷
पूर्वाश्रमीच्या आयपीसील (आता रिलायन्स) कंपनीने कमी मोबदला देऊन आमच्या ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन आम्हां शेतकऱ्यांना भूमिहीन केले. त्यानंतर आयपीसीएल ने आपली कंपनी रिलायन्स समूहाला विकून आम्हाला देशोधडीला लावले. तरी सुद्धा ग्रामस्थ शांतच होते. कारण ग्रामस्थांच्या हातात काहीही उरले नव्हते. परंतु आम्ही आत्ताची पिढी शांत बसणार नाहीत. आमच्या कुहिरे ग्रामपंचायत हद्दीतीतील ग्रामस्थांना रिलायन्स कंपनीच्या व्यवस्थापनाने मूलभूत सुविधा द्याव्यात अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा कुहिरे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्रज्ञा वैभव जवके यांनी ग्रामस्थांच्या बैठकीत दिला.
कुहिरे ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (दि.२८) संपन्न झालेल्या या बैठकीत रिलायन्स व्यवस्थापनाने गावातील उच्चशिक्षित मुलांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे, आयटीआय, डिप्लोमा, बी.एसस्सी झालेल्या आदिवासी बांधवानाही नोकरीत सामावून घ्यावे, कातकरीवाडीचा पुनर्वसन प्रश्न व ट्रान्सफार्मरचा प्रश्न सोडवावा, रिलायन्स कंपनीने सीएसआर फंडातून गावाचा विकास करावा, ग्रामपंचायतीचा कर वाढवून द्यावा तसेच कंपनीत शिकाऊ उमेदवार म्हणून स्थानिकांना प्राधान्य द्यावा अशा विविध मागण्या रिलायन्स व्यवस्थापने कडे सरपंच सौ. प्रज्ञा वैभव जवके यांनी केल्या आहेत.
दरम्यान रायगडचे कर्तव्यदक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाने पालकमंत्री नामदार अदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बेणसेवाडी ते चाफेवाडी रस्ता (खर्च 5 कोटी 20 लाख रुपये )मंजूर होऊन त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदार देखील निच्शित करण्यात आला असून लवकरच या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न होणार आहे तसेच ना. आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत सचिवालय (खर्च 10 लाख रुपये ) व चाफेवाडी अंतर्गत रस्ता (खर्च 5 लाख रुपये )मंजूर करण्यात आला असल्याची माहिती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष तथा कुहिरे ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक उदय जवके यांनी दिली.
दरम्यान यावेळी खा. तटकरे, ना. तटकरे, आ.तटकरे यांचे ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सौ. प्रज्ञा जवके यांनी आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीच्या वेळी कुहिरे ग्रामपंचायत सरपंच सौ. प्रज्ञा वैभव जवके, उपसरपंच मनोहर पारधी, ग्रा.पं. सदस्या सौ. मनस्वी महेंद्र जवके, सौ. पूनम प्रज्योत शिंदे, पंकज जवके, महेंद्र जवके, ग्रामसेवक दिनेश मोहरकर आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.








Be First to Comment