Press "Enter" to skip to content

कविश्री अरुण दत्ताराम म्हात्रे यांची समयसूचकता !

पतंगाच्या मांज्यात गुंतलेल्या पक्षाला जीवनदान !! 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । उरण । 🔶🔷🔶

बगळा या पक्षाच्या पायाला पतंगाचा मांजा हा धागा गुंडाळला गेल्यामुळे तो बांबूंच्या उंच माथ्यावरील फांद्यांमध्ये दोन दिवस अडकून होता. आपल्या घराच्या गॅलरीतून पाहता कविश्री अरुण दत्ताराम म्हात्रे यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी वैभव पारिंगे यांना फोन करून कळविले.

बांबूंची झाडे काहीशा उंचावर आणि अडचणीत असल्यामुळे सदर पक्षाला सोडविणे फार कठीण होते. कालुसिंग हे बांबूंच्या झाडांवर चढून त्यांनी सदर पक्षाला फांदी तोडून खाली आणले. अशाप्रकारे त्या पक्षाच्या पायाला गुंडाळलेला मांजा काळजीपूर्वक कापून सदर पक्षाला मोकळे केले. याकामी कवीश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे, वैभव पारिंगे, कालुसिंग तसेच कुमार मनीष आणि सुधीर यांच्या प्रयत्नांना यश आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.