Press "Enter" to skip to content

परमानंद आश्रमासाठी छोट्याची मदत : खाउचा डबा फोडून दिले निस्वार्थ दान

सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग । 🔷🔶🔷

आपले आजोबा पेण तालु क्यातील प्रसिध्द श्री स्वामी परमानंद आश्रमाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याने आपल्या खाउच्या डब्यात जमलेले ५५५५/- रुपये ट्रस्टचे कार्यकारणी सदस्य तथा सल्लागार रायगड भूषण जयपाल पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. 

पुढील ५ वर्षासाठी आपले आजोबा निवृत्त शिक्षक कृष्णकांत पाटील हे अध्यक्ष झाल्याने त्यांचे नातू आणि नात कु.कुशल प्रदिप पाटील व कुंजल प्रदिप पाटील यांनी आपली आजी निवृत्त शिक्षिका सौ. पुष्पलता कृष्णकांत पाटील यांच्याकडे आमच्या खाउच्या डब्यात जेवढे पैसे असतील तेवढे आश्रमाच्या जिर्णोध्दारासाठी द्यावेत असा तगादा लावला होता. ते पैसे वडखळ येथील निवासस्थानी जयपाल पाटील आले असता त्या दोघांकडे ट्रस्टची पैसे दिल्याची पावती देवून त्यांचे अभिनंदन केले.

मंदिराचे काम सुरु असल्याने विविध देणगीदार मंदिरास मदत करीत आहेत. मात्र या छोट्या देणगीदारांनी आपल्या खाउच्या डब्यातील पैसे दिल्याने परमानंद आश्रमातर्फे त्यांना धन्यवाद दिले असून कोवीड-१९ संपल्यानंतर त्यांचा आश्रमात सत्कार ठेवून या छोट्यांचा आदर्श, संस्कृती जनतासाठी केलेल्या मदतीबद्दल ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे आजी-आजोबा, आई-वडील यांचे यावेळी आभार मानण्यात आले. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.