पेणच्या खारेपाट विभागातील मत्स्यशेती शेती बंधारे यांचे धरणे आंदोलन तुर्तास स्थगित 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔷🔶🔷
मूलभूत अधिकार संघर्ष समिति व पेण खारेपाटण विकास संकल्प संघटनांनी आज प्रांत कार्यालय समोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली मात्र कोरोनाची महामारी लक्षात घेता प्रशासनाने सदर आंदोलन मागे घेण्यात यावे असे शेतकऱ्यांना कळविले असल्याने त्यांच्या विंनतीमुळे आजचे आंदोलन स्थगित केले असे दिलीप म्हात्रे यांनी जाहीर केले.
काल मिळालेल्या आगाऊ सुचने नुसार पोलीस प्रशासनाला सहकार्य करत व कोरोना महामारी लक्षात घेत त्यादृष्टीने मोजकेच शेतकरी, कार्यकर्ते एकत्र आले.तत्पूर्वी प्रांतधिकारी विठ्ठल इनामदार यांनी या सर्व मागण्या संदर्भात विषय व त्यातील मागण्या मुद्दे विचारात घेऊन प्रत्येक मागण्यासंदर्भात दिनांक 2 नोव्हेंबर रोजी एका मिंटिगसाठी येण्याचे आदेश दिले आहे असे सांगितले.
ऑगस्ट 2019 नैसर्गिक आपत्ती दरम्यान झालेल्या मत्स्य शेती तलावाची नुकसान भरपाई मिळणेबाबत, सातबारावर मस्य शेतीची नोंद व मत्स्य तलावांचे रजिस्ट्रेशन व इतरही प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत त्याचप्रमाणे परतीच्या पाऊस , पावसाचे पाणी व समुद्राच्या भरतीचे पाणी ,खाडी बंधारा तूटुन शेतात पाणी पसरले तयार झालेली पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले यात सर्वात महत्त्वाचा गंभीर मुद्दा म्हणजे या बांध उघाडीचा आहे याचा त्वरित बंदोबस्त केला नाहीतर शेकडो एकर शेतीत हे खारे पाणी घुसू शकते.
भविष्यात ही जमीन पूर्णतः नापिक होऊन शेतकऱ्यांच्या कष्टाचे हक्काचे दोन घासही हिरावून घेणार आहे यासह विविध प्रश्नासंदर्भात हे आंदोलन होते.मात्र 2 नोव्हेंबर रोजी प्रांतधिकार्यांनी लावलेल्या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील अशी अशा ठेवत असल्याचे मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे सचिव मोहिनी गोरे यांनी सांगितले.यावेळी राजेंद्र झेमसे, प्रकाश माळी, गणपत भाऊ, दिलीप म्हात्रे यासह मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे संदीप रेणुका ,नंदा म्हात्रे, मंदाकिनी गायकवाड संतोष ठाकूर आदि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment