वाढदिवस साजरा न करता विक्रांत पाटील यांनी दिला १,०१,००० चा धनादेश
सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)
भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी आपला वाढदिवस कोरोना विषाणूच्या प्रादूर्भाव तसेच कोकणातील निसर्ग चक्री वादळ यामुळे साजरा न करता आपल्या बांधवांना मदतीचा हात म्हणूनरू १,०१,००० चां धनादेश भाजपा वरिष्ठांकडे सुपूर्द केला. आपदग्रस्तांना मदत म्हणून खारीचा वाटा उचलत रू १,०१,००० चां धनादेश माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे विक्रांत पाटील यांनी सुपूर्त केला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे ही उपस्थित होते.
या व्यतिरिक्त राज्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनीही भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत भरीव मदत केली आहे व यापुढेही ते करत राहणार असल्याची माहितीभाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी दिली.













Be First to Comment