Press "Enter" to skip to content

दामिनी पथक कार्यान्वित करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षांची मागणी

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी दामिनी पथकाची निर्मिती करावी

– प्रज्ञा चव्हाण,अध्यक्ष, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस

दिवसेंदिवस महिलांवर होणारे अन्याय अत्याचार आणि त्यामुळे पीडित होणाऱ्या महिला व विशेषतः युवतींच्या रक्षणासाठी नवी मुंबई आयुक्तालय परिमंडळातील नागरी क्षेत्रासाठी दामिनी पथकांची नियुक्ती करावी अशी मागणी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा प्रज्ञा चव्हाण यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.त्यांनी यावेळी त्यास्वरुपाचे निवेदन सादर केले.
चव्हाण यांनी आयुक्त महोदयांना निवेदन देताना युवती काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आदिती तटकरे यांनी संपूर्ण राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी वेगळ्या प्रकारची उपाययोजना करण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती गटाद्वारे करण्याच्या सूचना केल्या असून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहरातील महिलांसाठी विशेषता युवतींसाठी दामिनी पथक यांच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेला संपूर्ण सहकार्य राष्ट्रवादी काँग्रेस करीत राहील अशा प्रकारचे आश्वासन त्यांनी दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.