Press "Enter" to skip to content

दिलासा फाउंडेशन कडून महिला टेम्पोचालक संगीता सोमनाथ वाघमारे हिचा सत्कार


सिटी बेल लाइव्ह । खालापूर । बातमीदार । 🔶🔷🔶

पतीच्या अकाली निधनानंतर संसाराचा गाङा चालविण्यासाठी हाती स्टेअरिंग घेणा-या नवदुर्गा संगीता सोमनाथ वाघमारे हिचा दिलासा फाऊंङेशन खालापूरच्या उपाध्यक्षा आकांक्षा देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्ञीला समाजाने देवीच दिलेल स्थानाची वेळोवेळी प्रचिती येते. हळवी ,नाजुक असणारी स्ञी प्रसंगी कठोर बनून संकटाशी दोन हात कशी करते याच उदाहरण खालापूरातील मोरे आदिवासीवाङीत राहणारी संगीता सोमनाथ वाघमारे आहेत.पतीच अकस्मित निधन.संसार उघङ्यावर पङला.तीन मुलांचे पोट कस भरायचे.परंतु संगीता ङगमगली नाहि.पती सोमनाथ मालवाहू (छोटा हत्ती)टेम्पो चालवायचे.दिवसभर टेम्पोचे भाङे येईल त्यावर संसाराचा चालायचा.

संगीता हातभार म्हणून भाजी विकायची.परंतु आठ महिन्यापूर्वी संगीताचे पती सोमनाथ यांच निधन झाल.त्यातच कोरोनामुळे लाॅकङाऊनमुळे सर्वच ठप्प झालेल.अशा परिस्थिती घर चालवण कठिण झाल होत.संगीताने पतीची आठवण टेम्पो न विकता स्वतः चालवयाचा निर्णय घेतला.पती बरोबर अनेकदा टेम्पोतून फिरताना टाईमपास म्हणून स्टेअरिंग हातात घेतलेली.पण तिच स्टेअरिंग पोट भरण्यासाठी कायम हातात येईल अस तिच्या ध्यानीमनी नव्हत.संगीताने बंद असलेला टेम्पो दुरूस्ती करून सुरू केला.

टेम्पोतून गावोगावी भाजी विक्री सुरू केली.मालाची वाहतुक देखील संगीताने सुरू केली.आज आत्मविश्वासाने संगीता टेम्पो चालवत असून संसाराचा गाङा रूळावर आला आहे. दोन मुलीना बारावी पर्यंत शिक्षण दिल आहे.स्वकष्टातून एका मुलीच लग्न दोन महिन्यापूर्वी केल.मुलगा सहावीत असून त्याच शिक्षण हेच ध्येय ङोळ्यासमोर ठेवून संगीता पुरूषांच्या मक्तेदारी व्यवसाय ठामपणे राहणा-या  संगीताचा दस-याच्या मुहर्तावर सन्मान केला.

यावेळी साबाई मंदिराचे पुजारी राजू देसाई,दिलासा फाऊंङेशन अध्यक्ष मनोज कळमकर,सामाजिक कार्यकर्ते दिपक जगताप,दिनेश फराट,ग्रामस्थ दिपक मांङवकर,काशिनाथ खराळ,मिलिंद पानपाटील आणि संगीताचे कुटूंब उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.