Press "Enter" to skip to content

सी बर्ड मरीन सर्विसेस प्रा.लि कंपनी विरोधात संभाजी ब्रिगेडचा एल्गार

कामगारांच्या न्यायहक्कांसाठी कंपनीवर धडक 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶

रायगड जिह्यातील  कष्टकरी, मजूर व कामगार वर्गाचे होणारे शोषण व अन्यायाविरोधात संभाजी ब्रिगेड आता मैदानात उतरली आहे. सी बर्ड मरीन सर्विसेस प्रा.लि कंपनीतील कामगाराच्या न्याय व हक्क मागण्यासाठी संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियनच्या वतीने ने तिव्र आंदोलन पुकारले आहे.  

संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियनच्या वतीने बुधवार दिनांक (28) रोजी मे. सीवर्ड मरीन सर्विसेस प्रा.लि. , मे . ट्रायटोन मल्टीमोडल इंडिया प्रा . लि . , सीएफ . एस प्लॉट नं ७०/८१ , १०६ बी / १०६ सी , सेक्टर १ , द्रोणागिरी रोड , उरण येथील  कंपनी व्यवस्थापनाच्या अन्यायकारी धोरणांविरोधात संभाजी  ब्रिगेड धडक देणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड कोकण प्रदेश अध्यक्ष व युनियनचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी दिली आहे.

संबंधीत कंपनी कामगारांवर अतोनात अन्याय व शोषण करत आहे, तसेच त्यांच्या मुलभूत हक्क व गरजा अमान्य करत आहे . त्यांना तडकाफडकी कामावरून काढले जात आहे , पगार दिले जात नाहीत . कोविड १९ च्या काळात राज्य शासनाने दिलेल्या नियमाचे उल्लंघन  व पायमल्ली करीत आहेत . असा आरोप करीत सदर कंपनी विरोधात बुधवारी दि.(28 ) रोजी सकाळी 11 वाजता संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियन संविधानिक मार्गाने आंदोलन छेडणार आहे .

कोरोना महामारीच्या काळात  हतबल झालेल्या  कष्टकरी, श्रमजीवी व आर्थिक विवंचनेत  अडकलेल्या कामगार वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी  सी बर्ड मरीन सर्विसेस प्रा . लि . द्रोणागिरी येथे आंदोलन होणार असून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन  सचिन सावंत देसाई यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.