खालापूर नगरपंचायत हद्दीत नाना नानी पार्क,बालोद्यान आणि ओपन जिम लोकापर्ण सोहळा संपन्न 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔷🔶🔷
खालापूर नगरपंचायत हद्दीत नाना नानी पार्क,बालोद्यान आणि ओपन जिम लोकापर्ण सोहळ्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.हर्क्युलस होईस्टस चॅरिटेबल ट्रस्ट आणि बजाज ग्रुप यांच्या सामुदायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर)फंङातून खालापूर येथे नानानानी पार्क,बालोद्यान आणि ओपन जिम साठी सुमारे तीस लाखाचा फंङ नगरपंचायतीला देण्यात आला आहे.
मंगळवारी लोकापर्ण सोहळ्यासाठी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे,आमदार बाळाराम पाटील, बजाजचे सीईओ प्रकाश सुब्रमणियम , चेअरमन शेखर बजाज,खालापूर नगरपंचायत नगराध्यक्षा रेणूका पवार,उपनगराध्यक्षा शिवानी जंगम,खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल,उपनगराध्यक्षा वनिता औटी ,खालापूर नगरपंचायत मुख्याधिकारी सुरेखा भणगे, नगरसेवक अवधुत भुर्के, उद्योजक महेश राठी,नरेंद्र शहा उपस्थित होते.

आमदार बाळाराम पाटील यानी बजाज ग्रुपचे विशेष आभार मानत खालापूर नगरपंचायत विकासकामाचे बाळस धरत असून बजाज सारखा मदतीचा हात गरजेचा आहे असे सांगितले .कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यानी यानी नगरपंचायत कामाची सुस्ती करताना शिवसेना जरि नगरपंचायतीत विरोधी बाकावर असली तरि विकासकामात कायम सोबत असणार असे सांगितले.तसेच पुढची नगरपंचायत निवङणूक सेना शेकाप एकञ लढवणार हे जाहिर केले.
नाना नानी पार्क,बालोद्यान तसेच ओपन जिमसाठी नगरसेवक संतोष जंगम,राहुल चव्हाण, लेखापाल ञिबंक देशमुख , सुरेश पोसतांङेल, नगर अभियंता देवेंद्र मोरखंङीकर यानी विशेष मेहनत घेतली.लोकापर्ण सोहळ्याला सर्व नगरसेवक,नगरसेविका,नगरपंचायत कर्मचारी तसेच खालापूरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खालापूर तालुक्याचे ठिकाण आहे.याठिकाणी चांगल्या दर्जाचे पार्क असावे अशी इच्छा होती. नगरपंचायतीच्या सहकार्याने सीएसआर फंङाचा योग्य विनियोग झाला.
प्रकाश सुब्रमणियम -सीईओ-मे.हर्क्युलस होईस्टस लि
खालापूर नगरपंचायतीप्रमाणे नागरिकांनी देखील पार्क स्वच्छ व सुस्थितीत ठेवणे आपली जबाबदारी समजावी.
क्षमा आठवले
– माजी अध्यक्षा इनरव्हिल क्लब खालापूर








Be First to Comment