नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा या गावचे पुनर्वसनासाठी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे मुख्यमंत्र्याना साकडे 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷
जेएनपीटी बंदराच्या प्रकल्पासाठी १९८६ साली शेवा व कोळीवाडा ही गावे विस्थापित केली आहेत. महाराष्ट्र शासनाने कोकण आयुक्त व जिल्हाअधिकारी रायगड यांच्या मार्फत दोन्ही गावांचे पुनर्वसन केले. नवीन शेवा गावाचे पुनर्वसन बोकडविरा गावाजवळ केले व हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन बोरी-पाखाडी या ठिकाणी केले. आजपर्यंत ३४ वर्षात सतत जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त, जेएनपीटी चेअरमन यांच्याकडे अनेकवेळा पत्रव्यवहार, आंदोलने-उपोषणे केलेले आहेत. तरी सुद्धा या दोन्ही गावांचा पुनर्वसानाचा प्रश्न आजही प्रलंबीत आहे.
माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संबधित खात्यांचे मंत्री व अधिकारी यांच्याकडे सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी पत्राद्वारे साकडे घातले आहेत.
त्यामुळे लवकरच मंत्रालयात या प्रश्नावर बैठक बोलाविण्यात येईल असे संबधित विभागाकडून कळविण्यात आले असल्याची माहिती मनोहरशेठ भोईर यांनी दिली.








Be First to Comment