सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷
रोहा शहरातील व्यापारी संघटनेची सभा विलास गुजर यांच्या निवास्थानी संपन्न झाली.या सभेत सर्व व्यापारी संघटनेच्या सल्ल्यानुसार अध्यक्षपदी विलास र.गुजर यांची निवड करण्यात आली.
रोहा शहरातील व्यापारी संघटना अनेक वर्षापासून कार्यरत असून हि संघटना विविध प्रकारचे आपले व्यवसाय सांभाळून अनेक सामाजिक शैक्षणिक कार्य करण्यात ही संघटना नेहमी सक्रिय आहे.
यावेळी कार्याध्यक्ष मनोज बोराणा,उपाध्यक्ष दिलीप जैन,सचिव जितेंद्र गुप्ता,खजिनदार दिलखुश कुमावत, सल्लागार सुनिल परब,मगिलाल जैन,हर्षदभाई छेड्डा,बाबुशेठ धनराजजी,नरेश कुशवाहा,मदन जैन,धनाजी शेठ,रमेश कुमावत,प्रदीप आठवले,यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष विलास गुजर व सर्व निवड कमेटीचे विविध स्थरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे.








Be First to Comment