सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷
मुंबई-गोवा महामार्गावरील राष्ट्रीय महामार्ग १७ वरील सुकेळी खिंडीत कायमस्वरूपी पोलिस चौकी बसविण्याची मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत फक्त गणेश उत्सव साठी पोलिस चौकी सुरु केली जाते यानंतर बंद करण्यात येते. सुकेळी खिंड हे मुंबई गोवा हायवेवरील अतिशय निर्जन ठिकाण आहे. कोरोनामूळे गेली आठ महीने वाहतुक ठप्प झाली होती परंतु काही प्रमाणात वाहतुक पुर्व पदावर येत असून या महामार्गावर अनेक औद्योगिक क्षेत्र,पर्यटन थळे,असल्याने या मार्गावरुन सतत वाहनांची वर्दळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. महामार्गाचे चौपदरीकरण काम गेली दहा वर्षांपासून सुरु असुन याकामात कोणतीही प्रगती नाही परंतु सुकेळी खिंडीत डोंगर खोदुन ठेवल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे.
यामुळे वाहतूक कोंडीही निर्माण होते. अनेक वेळा अपघात होतात.यामुळे अपघात ग्रस्त यांना तातडीची मदत न मिळाल्याने अनेकांना आपला प्राण ही गमवावा लागतो.याचा प्रत्यय दररोज येत आहे यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी पोलिस चौकी नसल्याने त्वरित कोणतेही मदत होत नाही. शिवाय या ठिकाणी चोरीचे प्रकारही घडले आहेत या सर्व परिस्थिती वर मात करण्यासाठी व प्रवाशी वर्गाच्या संरक्षणासाठी ही पोलिस चौकी कायम स्वरुपी सुरु करावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.








Be First to Comment