सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷
उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. ही उरणकरांसाठी समाधानकारक गोष्ट आहे. आज दिवसभरात फक्त २ जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. तर २ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. आज कोणीही मयत नाही.
आज एकूण पॉझिटीव्ह २०५९, उपचार करून बरे झालेले १८९४, उपचार घेणारे ५६, मयत १०९ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज सोनारी १, नागाव १ असे २ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. रिद्धी सिद्धी अपार्टमेंट १, मुळेखंड १ असे २ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. आज कोणीही मयत नाही.
उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा कमी होत चालला आहे. तर उपचार घेऊन घरी परत येण्याची आकडेवारी वाढत आहे. तसेच मयताची आकडेवारीही कमी झाल्याने उरणच्या जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.








Be First to Comment