Press "Enter" to skip to content

दीपक फाऊंडेशन यांच्या वतीने आदिवासी महिलांना कोंबड्यांचे वाटप

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । 🔷🔶🔷

दीपक फाऊंडेशन यांच्या वतीने उद्योजिका प्रकल्प अंतर्गत रोहे तालुक्यातील धानकान्हे व तळवली त.अष्टमी आदिवासी समाजातील महिला वर्गाला रोजगार निर्मितीसाठी कोंबड्यांचे वाटप करण्यात आले.

आदिवासी समाज बांधवांनी स्वतःच्या पायावर उभे राहून रोजगार निर्मिती करावी यासाठी दीपक फाऊंडेशन यांच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून रोजगार निर्मितीसाठी कोंबड्यांचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

धानकान्हे व तळवली त.अष्टमी येथील आदिवासी वाड्यांवर जाऊन दीपक फाऊंडेशन यांनी आपल्या या उपक्रमाची सुरूवात केली आहे. यावेळी दीपक फाऊंडेशन प्रोजेक्ट काँर्डिनर अजय अवाडे,मल्लेश हन्चली,प्रिती जवरत, सिद्धी भगत,ओजस्विनी महाडिक, मा.उपसरपंच रघुनाथ कोस्तेकर, युवा कार्यकर्ते रविंद्र मरवडे,मारुती बामणे, सुभाष बामणे,मधुकर पवार,गुलाब वाघमारे,हरिश्चंद्र पवार, सुवर्णा वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने गरजू आदिवासी महिला उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.