सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔶🔷
काही वर्षांपूर्वी चाळीशी गाठलेल्या मित्रांनी एकत्र येऊन कामाच्या व्यापातून विरुंगळा म्हणून ‘फोर्टी प्लस’ क्रिकेटची स्थापना केली. मध्यंतरी कोरोनाचे संकट आल्याने मागील सिझन मध्ये त्यांना खेळता आले नाही. दसऱ्याच्या मुहूर्तावर या सर्वांनी मैदानावर जाऊन क्रिकेटच्या साहित्याची पूजा केली आणि शासन आदेश मिळाल्यावर पुन्हा मैदानात येण्याचा संकल्प केला. यावेळी 40 – 42 ते 60 – 65 वयाचे सदस्य उपस्थित होते.

सालाबाद प्रमाणे विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आपल्या ‘फोर्टी प्लस’ कर्जत क्रिकेटच्या नविन सिझनचा शुभारंभ ज्येष्ठ सदस्य रणजीत जैन आणि मधुकर सुर्वे यांच्या हस्ते क्रिकेट साहित्याचे पूजन करून करण्यात आला यावेळी संस्थापक गजेन्द्र दांडेकर, कार्याध्यक्ष श्री.शशांक शेट्टी, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, बाळा धनवे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी कोरोना संकटानंतर शासनाने आदेश दिल्यावर मैदानात येण्याचा संकल्प केला.
याप्रसंगी शिरीष दिघे, सचिन मनोरे, विनायक परांजपे, विराग फाटक, दिलीप जाधव, दिपक राणे, गिरीश सुर्वे, सुनिल खातू, जयवंत पिंगळे, तुषार जोशी, जितेंद्र देशमुख, किरण देशमुख, किशोर देशमुख, दिनेश कडू, संदीप देशमुख, चन्द्रकांत ठाकरे, जगदीश पालकर, हर्शल पारखी, मंगेश म्हसे, विकी गुंजाळ आदी सदस्य उपस्थित होते.








Be First to Comment