सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔶🔷
इनरव्हील क्लब ऑफ कर्जत च्या नवीन 2020 – 21 वर्षाकरीता पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला,क्लबच्या अध्यक्षपदी प्राची चौडिया यांची निवड करण्यात आली.
रॉयल गार्डनच्या सीबीसी सभागृहांमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रारंभी दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, माजी क्लबच्या कमिटीने मागील वर्षाची अहवाल सादर केला, त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून प्राची चौडिया, सेक्रेटरी उत्तरा वैद्य, खजिनदार करुणा पराडकर, आय एस ओ कश्यपी ठक्कर, उपाध्यक्ष अवंतिका गायकर, आय पी पी सुलोचना गायकवाड यांची निवड करण्यात आली.
प्राची चौडिया यांनी नवीन वर्षाचे संकल्प सभासदांसमोर मांडले.
मोनिका बडेकर यांनी क्लबचे महत्व पटवून दिले.याप्रसंगी संगीता जोशी, वनिता सोनी, सरस्वती चौधरी, शिला गुप्ता, साक्षी अडसुळे, भाग्यश्री शेळके, सुरेखा मराडे आदी उपस्थित होत्या.








Be First to Comment