Press "Enter" to skip to content

रायगड भुषण मनोज पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध सामाजिक उपक्रम

सिटी बेल लाइव्ह । पाणदिवे । प्रतिनिधी । 🔷🔶🔷

महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अनावरण करुन वटवृक्ष ही लावण्यात आले, तसेच वाढदिवसानिमित्त तालुका उरण येथील वेश्वी वाडीतील गरिब व गरजू विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका, क्रीडा साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे दसऱ्या सणाचे विशेष महत्व जाणून सोनेरी पानांचा वनराज आपट्याचे वृक्षारोपण ही करण्यात आले.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर , वेश्वी ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र मुंबईकर, रमणिक म्हात्रे गुरूजी, वटवृक्ष संस्थेचे किरण मढवी व गणेश मढवी ,नेहरू युवा केंद्र अलिबाग चे माजी राष्ट्रीय सेवाकर्मी आकाश घरत, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी मनोज पाटील सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छांसह त्यांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल भरभरुन कौतुक केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.