खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदार निधीमधून गुळसुंदे येथे बौद्धविहारासाठी 10 लाखांचा निधी मंजूर 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷
माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर सुद्धा शांत न बसता विकासकामांच्या अथवा सामाजिक, शैक्षणिक माध्यामतून आपली निरंतर सेवा समाजासाठी चालू ठेवली आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक दसरा या सणाच्या शुभमुहूर्तावर, गुळसुंदे येथील नागरिकांनी गेल्या निवडणुकीमध्ये बौद्धविहाराची मागणी केली होती. त्यांना दिलेला शब्द पूर्ण करत, खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदार निधीमधून (१० लक्ष निधी) गुळसुंदे येथे बौद्धविहारासाठी मंजूर करून घेण्यात आला व त्याचेच भूमिपूजन आज माजी आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते संपन्न झाला.
हे भूमिपूजन संपन्न होत असताना माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कि, मी जरी आता आमदार नसलो तरी यापूर्वी ज्याप्रमाणे ५ वर्षात आमदार असताना विकास कामे केलेली होती. त्याचप्रमाणे यापुढेदेखील भविष्यात आपल्या महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून विकास कामे करत राहीन. त्यामुळे येथील समाजाने माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहान त्यांनी या विभागातील नागरीकांना केले.

यावेळी शिवसेना पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, उपतालुकासंघटक सुधीर पाटील, विभगाप्रमुख ज्ञानेश्वर माळी, राजू पाटील जि.प.सदस्य, जगदिश पवार पं.स.सदस्य, सरपंच हरीश बांडे, ग्रा.पं.सदस्या नूतन पाटील, ग्रा.पं.सदस्य मारुती माठेल, ग्रा.पं.सदस्या नीता महाडिक, जेष्ठ शिवसैनिक काशिनाथ कांबळे, युवा.वि.अ. प्रमोद गोळे, युवा.उपा. स्वप्नील चौलकर, शाखाप्रमुख प्रथमेश पाटील, किरण मोरे, सावळे शाखाप्रमुख, देवलोली शाखाप्रमुख, निलेश शिगवण लाडीवली शाखाप्रमुख, तसेच विभागातील पदाधिकारी व शिवसैनिक सोशल डीस्टन्स नियमानुसार उपस्थित होते.








Be First to Comment