Press "Enter" to skip to content

धाटाव विठ्ठल रुक्मिणी मंदिराला कडू कुटुंबियांच्या वतीने पालखीची भेट

सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे । 🔷🔶🔷

रोहा तालुक्यातील धाटाव विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर कडु कुटुंबीयांनी पालखी भेट दिली आहे.दरम्यान या पालखीचा मंदिराच्या विविध धार्मिक कार्यक्रमाकरिता चांगला उपयोग होणार आहे.

कै.सदाशिव श्रीपत कडु यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार समितीवर काही काळ काम केले आहे.हे मंदिर उभारण्यात ज्येष्ठ नेते भाईसाहेब पाशिलकर व सहकारी वर्गासमवेत मंदिर उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.त्यांचे चिरंजीव शाम कडु,संजय कडू,संतोष कडु व जितेंद्र कडु यांनी त्यांच्या स्मरणार्थ दसऱ्याच्या मुहूर्तावर धाटाव मधील मंदिरास पालखी भेट देण्यात आली.

मंदिरासाठी पालखी स्वीकारताना यासमयि रायगड भूषण पुरस्कार प्राप्त हभप पुरुषोत्तम पाटील महाराज,खेळू रटाटे,विठोबा फाटक यांसह इतर मंडळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.