Press "Enter" to skip to content

आज उरणमध्ये ४ पॉझिटीव्ह

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷

उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. ही उरणकरांसाठी समाधानकारक गोष्ट आहे. आज दिवसभरात फक्त ४ जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. तर ४५ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. आज कोणीही मयत नाही.

आज एकूण पॉझिटीव्ह २०५७, उपचार करून बरे झालेले १८९२, उपचार घेणारे ५६, मयत १०९ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज लक्ष्मी अपार्टमेंट उरण नागाव रोड १, फुल गल्ली म्हातवली १, इमानदार नगर मोरा रोड १, ओएनजीसी चारफाटा १ असे एकूण ४ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर ओएनजीसी चारफाटा १, नागाव १८, चाणजे १, केगाव १, धुतुम २, बोरखार १, नवघर १, उरण ७, वेश्वि १, विंधणे १, करंजा ४, भवरा ३, आंबिकावाडी नागाव २, कळंबुसरे १, म्हातवली १ असे एकूण ४५ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

आज कोणीही मयत नाही. उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा कमी होत चालला आहे. तर उपचार घेऊन घरी परत येण्याची आकडेवारी वाढत आहे. तसेच मयताची आकडेवारीही कमी झाल्याने उरणच्या जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.