Press "Enter" to skip to content

लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानची नवनियुक्त पदाधिकारी कार्यकारणी जाहीर

डॉ.संजय सोनावणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र सुपूर्द 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷

सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, उद्योग , कलाक्रीडा व सेवाभावी क्षेत्रात आजवर प्रभावी व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानची घोडदौड वेगाने सुरू आहे. संस्थेच्या कार्यकक्षा अधिक रुंदाव्यात या उद्देशाने राज्यात व परराज्यात कार्यकुशल नेतृत्व असणाऱ्यांवर पदभार सोपवला जात आहे.

लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र्र (र.नं) या संस्थेच्या रिक्त असलेल्या पदावर तसेच काही नव्याने निर्माण केलेल्या पदांवर नवनियुक्ती पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. कार्यक्षम व कर्तृत्ववान व्यक्तींना संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.संजय सोनावणे यांनी नियुक्तीपत्र सुपूर्द करीत पदभार सोपवला आहे, व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत.

सदर पद नियुक्ती कालावधी दि. 31/12/2020 पर्यंत वैद्य राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये निलेश सोनावणे- राष्ट्रीय उपाध्यक्ष, ऍड मनोज म्हात्रे- राष्ट्रीय महासचिव, सौ.संजीवनी शिर्के- राष्ट्रीय मुख्य संयोजक, धम्मशील सावंत- कार्याध्यक्ष कोअर कमिटी, विरेन ठाणगे- उपाध्यक्ष कोअर कमिटी, सुरेश जुईकर- राज्याध्यक्ष, नितीन जोशी- राज्य कार्याध्यक्ष, श्रीमती शोभा सोनकांबळे- स्वीय सहायक राष्ट्रीय अध्यक्ष,यशवंत बिडये- राज्यप्रमुख सामाजिक विभाग, विवेक कांबळे- राज्य सचिव आरोग्य विभाग, प्रशांत पाटील-सदस्य राष्ट्रीय कमिटी,ऍड प्रथमेश जावळे- सदस्य राष्ट्रीय कमिटी, सचिन पाटील-सदस्य राज्य कमिटी, साक्षी पारगावकर- सदस्य राज्य कमिटी, रवींद्र सांगळे- जिल्हाध्यक्ष रायगड, इरफान तांबोळी- जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग रायगड, तबरेज कच्छी- जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग रायगड, प्रथमेश दांडेकर-जिल्हा सचिव शालेय विभाग, केवल गायकवाड- तालुकाध्यक्ष पनवेल आदी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या असून पूर्वीच्या दिनांक 01/06/2020 व दिनांक 21/09/2020 रोजीच्या आदेशातील इतर सर्व नियुक्त्या कायम ठेवण्यात आल्या असल्याची माहिती संस्थेच्या राष्ट्रीय मुख्य संयोजक संजीवनी शिर्के यांनी दिली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे डॉ.संजय सोनावणे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.