Press "Enter" to skip to content

लक्ष्मी बॉंब चित्रपटावर बंदी घाला – ह.भ.प बापूमहाराज रावकर

हिंदू देवतांचा अपमान करणारा चित्रपट 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔷🔶

जगातील हिंदू समाज मोठ्या उत्साहात दीपावली साजरी करीत असतो त्यामध्ये श्री महालक्ष्मी देवीची पूजा अर्चा करतात त्याच वेळेस अभिनेता अक्षय कुमार याचा लक्ष्मी बॉंब नावाचा चित्रपट येत आहे. संपूर्ण हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखवणारा हा प्रकार असून तो कदापि सुद्धा सहन करण्यात येणार नाही. हिंदू देवतांचा अपमान करणारा चित्रपटावर बंदी घाला अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने कार्याध्यक्ष हभप बापूमहाराज रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकामार्फत केली आहे.

प्रसिद्धी पत्रकात हभप बापूमहाराज रावकर यांनी म्हटले आहे की, काहीच दिवसापूर्वी “मुहम्मद : द मैसेंजर ऑफ गॉड” नावाचा चित्रपट येणार होता त्या वेळेस मुस्लीम धर्म गुरुंनी विरोध केला. मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखविल्या जातील म्हणून स्वतः राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी स्वतः चित्रपटावर बंदी घालण्यासाठी पत्र लिहिले होते तसेच अनेक नेत्यांनी या चित्रपटावर बंदीची मागणी केलेली होती.
यापुढे हिंदू समाजाने सुद्धा स्वतः विचार करून सातत्याने आपल्या धार्मिक भावना का पायदळी तुडविल्या जातात ? कुणीही नेते प्रशासन आपल्या धार्मिक भावनांच्या विचार करीत नाही याबाबत हिंदूनी नेत्यांना तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारायला हवा.

सर्वच किर्तन प्रवचनकार महाराष्ट्रात या चित्रपटावर बंदी यावी यासाठी जागृती करीत आहेत. अनेक हिंदुत्ववादी संस्था, संघटना कार्यकर्ते बंदीची मागणी करीत आहेत याचा सरकारने विचार करावा अन्यथा हिंदू समाजाच्या मनात दुजाभाव होत असल्याची भावना निर्माण होईल. असे शेवटी ह.भ.प बापूमहाराज रावकर यांनी म्हटले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.