Press "Enter" to skip to content

सुधागड वावळोली आदिवासी आश्रम शाळेतील 750 विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप

कोरोना संकटात महाराष्ट्र सैनिक संदीप मालुसरे व अजय अधिकारी यांनी जपली सामाजिक बांधिलकी 🔷🔶🔷

मनसे आमदार राजुदादा पाटील  व मनसे सचिव  सचिन मोरे  यांच्या वाढदिवसा निमित्त राबविला सामाजिक उपक्रम 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । पाली/रायगड । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷

कोरोनाच्या राष्ट्रीय संकटात महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेने सबंध राज्यभरात महत्वपूर्ण योगदान देत खऱ्या अर्थाने कोव्हिडं योध्याची भूमिका बजावली आहे. सुधागड तालुक्यात देखील मनसेने कोरोना काळात आवश्यक ते उपयुक्त साहित्य मोठ्या प्रमाणावर वाटप केले. मनसे आमदार राजुदादा पाटील  व मनसे सचिव  सचिन मोरे  यांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र सैनिक संदीप मालुसरे व अजय अधिकारी यांच्या सहकार्याने महाराष्ट्र नवनिर्माण विदयार्थी सेना सुधागड तालुका यांच्या वतीने ,आदीवासी आश्रम शाळा वावळोली  येथे ७५० विद्यार्थ्यांना करीता मास्क चे वाटप करण्यात आले.

माध्यमीक विदयालय वावलोली आश्रमशाळेच्या  मुख्याध्यापिका सौ- सरीता सावंत यांच्या कडे मास्क देण्यात आले. कोव्हिडं 19 च्या काळात आदिवासी विद्यार्थ्यांची काळजी घेत मनसेने हाती घेतलेल्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भविष्यात सुधागड तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीना सेनिटाईझर चे वाटप करण्यात येणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. 

 कार्यक्रमासाठी मनसे महिला आघाडी रायगड जिल्हा सचिव श्रीमती-लताताई कळंबे,म न वि से सुधागड तालुका माजी अध्यक्ष कु-सचिन झुंजारराव, म न वि से सुधागड तालुका सचिव कु-भावेश बेलोसे,जयवंत गुरव सर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाप्रसंगी सौ-सरीता सावंत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की  मनसे ने दिलेले मास्क हे विदयार्थ्याना आदीवासी  वाडया वस्त्यावर जाऊन आम्ही पोहचवू, तसेच आज शिक्षण महर्षी कै-दादासाहेब लिमये यांचा १o वा स्मुतीदीन असुन कार्यक्रमासाठी चांगला योग आला आहे असेही सावंत  म्हणाल्या.

कोरोनाच्या काळात योग्य ती गरज  ओळखून  मास्क दिल्याने मनसे कार्यकर्ते यांचे विद्यालयाचे आभार देखील मानले. याप्रसंगी सचिन झुंजारराव यांनी  आपले विचार मांडताना सांगितले  की मनसे अध्यक्ष  राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपुर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या काळात  मनसे  पक्ष संघटना व मनसे कार्यकर्ते हे सर्वत्रच मदतीसाठी पुढे आले.

सामाजीक बांधिलकी जपत  तळागाळातील कार्यकर्त्यांपासून वरिष्ठ  नेत्यां पर्यत प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या परीने मदत कार्य करीत आहे. मदतीचे उदाहरण देताना ठाणे पालघर चे जिल्हा अध्यक्ष मा श्री- अविनाश जाधव साहेब,व मनसे सरचिटणीस मा श्री-संदीप देशपांडे यांनी कोकणातील चाकरमानी यांना गणपती सणाला गावी जाण्यासाठी बसेस ची व्यवस्था करुन दिली. असे अजय अधिकारी यावेळी म्हणाले. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.