सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷
अशोका विजया दशमीदिनी 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन पालीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात उत्साही, धार्मिक व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी कोरोनाच्या पाश्वभूमीवर शासनाचे नियम व अटींचे पालन करून धम्मचक्र प्रवर्तन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला.

सुधागड तालुक्यातील अनेक गावातील बुद्धीविहारात देखील विविध वैचारिक व धार्मिक कार्यक्रमांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.पालीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमात पंचशील झेंडावंदन अशोक वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दीपक पवार यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नरेश शिंदे सर यांनी केले. तर धार्मिक विधी पूजापाठ दिलीप जाधव व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आपल्या अध्यक्षणीय भाषणात दीपक पवार यांनी सांगितले की जगातील सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ बलशाली वैभवशाली व साम्राज्यशाली असलेल्या सम्राट अशोकाने कलिंगच्या युद्धानंतर रक्तपात पाहून आपली शस्त्र खाली टाकली.

तथागत गौतम बुद्धांचा मानवतावादी, समतावादी, व सत्यावर आधारित विज्ञानवादी बौद्ध धम्म स्वीकारला. व स्वतःवर विजय मिळविला. बौद्ध धम्माचा प्रसार व प्रचार करण्यास आपल्या मुलांना सातासमुद्रापार पाठविले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म दीक्षेसाठी अशोक विजया दशमी हाच दिवस निवडला. म्हणून या दिवसाचे महत्व अधिक आहे. असे पवार म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अशोक विजया दशमी दिनाचे महत्व विशद केले.
या कार्यक्रमास रोहीणी जाधव महीला अध्यक्षा, सखाराम गायकवाड,नुतन शिंदे,संजिवनी जाधव,अस्मिता कांबळे, राहुल कांबळे ,नितिन जाधव,राजेश जाधव,संतोष जाधव , मोरेश्वर कांबळे, मनिषा कांंबळे ,राहुलभभाई सोनावळे, रविंद्र ओवाळ,भगवान शिंदे,आदींसह धम्मबांधव, भीमअनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Be First to Comment