Press "Enter" to skip to content

रायगड श्रमिक एकता संघाने केला कामगारांना भरघोस पगारवाढीचा करार

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷

रायगड श्रमिक एकता संघ युनियन यांनी मे भारत मेन्टन्स गोडाऊन कळंबुसरे मधील कामगारांचा भरघोस पगार वाढीचा करार घडवून आणला. यामुळे कामगार वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

तीन वर्षाकरिता ६ हजार पगारवाढ व पूर्ण पगार बोनस देण्यास कंपनीने सहमती दर्शविली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ११ सुट्या वाढवून दिल्या आहेत. ईएसआयसी पॉलिसी असूनही कामगारांना ग्रुप मेडिकल पॉलिसी देण्यात आली आहे. कामगार व कंपनी प्रशासन यांच्यात सुसंवाद ठेवण्याचे काम माजी आमदार विवेक पाटील यांनी केले आहे.

कामगारनेते युनियनचे उपाध्यक्ष रवी पाटील यांनी पूर्णवेळ वेतन कराराचे काम पाहिले. कामगारांच्या नवीन वेतन करारावर माजी आमदार विवेक पाटील, उपाध्यक्ष रवी घरत, सुभाष देशपांडे, अरविंद कासले, सुशील राऊत, महेश नाईक, मोकल विलसन व मालक इरफान पटेल आदी उपस्थित होते.
या वेतन करारा बाबत सर्व कामगार वर्गात आनंदाचे वातावरण असून सर्वांची दिवाळी आनंदात जाईल असा विश्वास कामगार प्रतिनिधींनी व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.