Press "Enter" to skip to content

रमाईनगर नागोठणे येथे 64 वा धम्मचक्रप्रवर्तन दिन उत्साहात साजरा

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा केला गौरव 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶

कोरोनाच्या पाश्वभूमीवर दरवर्षी जल्लोषात व विविध उपक्रमांनी साजरा होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन यंदा कोरोना परिस्थितीचे सामाजिक भान ठेवत रमाईनगर सह जिल्ह्यात सर्वत्र साधेपणाने साजरा करण्यात आले.

सारनाथ बुद्धविहार रमाईनगर नागोठणे येथे दि.(25)रविवारी  64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन धार्मिक कार्यक्रमासह उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आंबेडकरी बहुजन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांनी भूषविले. बुद्ध पूजापाठ व धार्मिक विधी श्रामनेर हेमंत जाधव, नितीन गायकवाड, मयूर गायकवाड यांनी पार पाडला.  यावेळी  ग्रामस्त मंडळाचे अध्यक्ष किरण गायकवाड व चंद्रकांत गायकवाड यांनी अशोक विजया दशमी दिनाचे महत्व विषद केले. 

अडीच हजार वर्षापूर्वीचे  तथागत गौतम बुद्धांचे तत्वज्ञान आजही जगभरात अंगिकारले जाते, प्रज्ञा शील करुणा, स्वातंत्र्य, समता , बंधुता , न्याय  या मूलभूत तत्वप्रणाली व सामाजिक समतेवर आधारित बौद्ध धम्म एकात्मता व बंधुभावाची शिकवण देतो. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अशोका विजया दशमी दिनी आपल्या लाखो अनुयायांना समतावादी व विज्ञानवादी बौद्ध धम्माची दीक्षा दिली म्हणून या दिवसाचे अधिक महत्व असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले. सम्राट अशोकाचे चक्र राष्ट्रध्वजावर घेतले. 

सम्राट अशोकाचे “सत्यमेव जयते ” हे ब्रीदवाक्य म्हणून देशाने स्विकारले. सम्राट अशोकाची चार सिंहाची प्रतीमा देशाची मुद्रा म्हणून स्विकारली. राजाला देशाचा सर्वोत्तम, तथा सर्वश्रेष्ठ राजा म्हणून मानले जाते. सम्राट अशोकामुळे भारताला जगात नावलौकिक प्राप्त झाले. अशोकामुळे सबंध विश्व भारताला अशोकाचा भारत म्हणून ओळखले जाते. ज्याच्या नावाने देशात सर्वोच्च शोर्य पुरस्कार अशोकचक्र दिला जातो.सम्राट अशोकाने सुवर्णमय भारत निर्माण केला आणि भारतात त्यांच्या काळात सोन्याचा धुर निघत होता.

कालिंगचा युध्द 9 दिवस चालले आणि 10 व्या दिवशी सम्राट अशोकानी शस्त्र खाली ठेऊन शांती, अहिंसा, प्रेम, दया ही मूलभूत तत्त्वे असलेला महान असा बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि त्यांनी स्वत:वर विजय मिळवला म्हणून या दिवसास “अशोकविजयादशमी” असे म्हणतात आणि याच मंगल  दिनी डॉ.  बाबासाहेबांनी आपल्या ओंजळीत बुद्ध धम्म दिला. म्हणून अशोका विजयादशमी दिन देशभरात उत्साहात साजरा होत असल्याचे पत्रकार धम्माशील सावंत यावेळी म्हणाले.

हेमंत जाधव यांनी आंबेडकरी चळवळ व  बौद्ध धम्माचा प्रसार व प्रचार करण्याची सर्वस्वी जबाबदारी भिम अनुयायी व धम्मबांधवांची असल्याचे हेमंत जाधव यांनी सांगितले. यावेळी के जी गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने पत्रकारिता,  सामाजिक, धार्मिक कार्य व प्रशासकीय सेवेत  उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विकास जाधव (वनविभाग), पांडुरंग गायकवाड (भूमिअभिलेख), धम्माशील सावंत(पत्रकार )आदींना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

पत्रकार धम्मशील सावंत, सन्मानार्थी

या कार्यक्रमास ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड, रमाईनगर ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष किरण गायकवाड, सचिव दिलीप गायकवाड, उत्सव कमिटी अध्यक्ष संजय गायकवाड, सचिव अमोल रणदिवे, खजिनदार अमोल रणदिवे, खजिनदार प्रणय आर्डे, सहखजिनदार  शाहीद अत्तर, रमेश गायकवाड, अशोक गायकवाड, केतन गायकवाड, मयूर गायकवाड, मनोज गायकवाड, सुनिल शिंदे, नंदाताई गायकवाड, वत्सला गायकवाड, शकुंतला गायकवाड, शोभा गायकवाड, सरिता जाधव आदींसह मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.