सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव – कर्जत । सुभाष सोनावणे । 🔷🔶🔷
दसरा – चेहरा ठेवा हसरा , मात्र या सणासुदीला कोरोनाच्या महाभयंकर महामारीमुळे अनेक संकटांना तोंड देऊन चेहऱ्यावरचे हसू पळालेल्या आदिवासी बांधवांना दसऱ्याचे औचित्य साधून श्रद्धा फाउंडेशनचे अविरत चालत आलेले धान्य वाटपाचे कार्य आजच्या दिवशीही दिसुन आले .
कर्जत तालुक्यातील जांभूळवाडी येथील आदिवासी वाडीतील ५० गरजू आदिवासी बांधवांना एक महिना पुरेल इतके कौटुंबिक दैनंदिन गरजेचे धान्य वाटप कर्जत तालुक्यातील वेणगाव येथील श्रद्धा फाउंडेशन या सामाजिक संस्थेने केले . दसरा सणाचे औचित्य साधत सोनरुपी अन्न – धान्य वाटप ही श्रद्धा फाउंडेशनची अमूल्य भेट आदिवासी बांधवांना मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसल्याचे चित्र पहाण्यास मिळाले . श्रद्धा फाऊंडेशन च्या सहकार्याने करण्यात आलेल्या या सोनरुपी धान्य वाटपाच्या कार्यक्रमास त्यांची सर्व टीम उपस्थित होती .







Be First to Comment