Press "Enter" to skip to content

भेरव येथील शेतकरी चिंतामण पवार यांचे उपोषण यशस्वी…! 

मागण्या पूर्ण करण्याचे तहसीलदारांचे लेखी आश्वासन : पंधरा दिवसांत आश्वासन पूर्ण केले नाही तर पुन्हा उपोषणाचा इशारा 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷 

सुधागड तालुक्यातील भेरव येथील शेतकरी चिंतामण पवार हे बिल्डर पागुर देसाई यांनी केलेल्या बनावट कागदपत्रांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सोमवार (दि. 19) पासून पाली तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. या कार्यालयातून नोंदविण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत पंधरा दिवसांत चौकशी करून त्यामध्ये चूक आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे आपण सुरु केलेल्या आमरण उपोषण रद्द करावे अशी विनंती तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी लेखी पत्राद्वारे केली. त्यानंतर चिंतामण पवार यांनी रात्री उशिरा आपले उपोषण स्थगित केले. याप्रकरणी रिपाइं कोकण प्रदेश अध्यक्ष जगदिशभाई गायकवाड यांनी प्रशासनासमवेत  चर्चा व  मध्यस्ती केली होती . 

  मात्र पंधरा दिवसांत याबाबत पारदर्शकपणे चौकशी न झाल्यास पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पवार यांनी दिला. यावेळी त्यांच्यासोबत रिपाइं कोकण प्रदेश अध्यक्ष जगदिश गायकवाड हे देखील उपोषणास बसणार आहेत.

    मौजे आवंढे ता. सुधागड येथील चिंतामण पवार यांच्या मालकीच्या जमिनी लगत असणाऱ्या सर्वे नंबर 104/0 व 106/04 यातील सर्व्हे नंबर 104/0 ही जमीन पागुर योगेश देसाई यांनी विकत घेऊन सन 2010 मध्ये जे प्रतिज्ञापत्र केले आहे. ते खोटे असून याबाबत तहसीलदार पाली-सुधागड यांना लेखी तक्रारीद्वारे निदर्शनात आणून दिले. तरी देखील अद्याप देसाई यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. प्रतिज्ञापत्रा करिता वापरण्यात आलेला शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर दिनांक 12 एप्रिल 2010 रोजी घेतला असून सदर प्रतिज्ञापत्र 13 डिसेंबर 2010 रोजी केले आहे. सदर प्रतिज्ञापत्र चौकशी करून कारवाई करण्यात यावी यासाठी शेतकरी चिंतामण पवार सोमवार (दि.19) पासून पाली तहसील कार्यालयाच्या परिसरात उपोषणास बसले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.