Press "Enter" to skip to content

रावे येथे कोरोना योद्ध्यांचा यथोचित सन्मान

सिटी बेल लाइव्ह । पेण । रत्नाकर पाटील । 🔷🔶🔷

पेण तालुक्यातील दुर्गम अशा रावे गावात कोरोना प्रादुर्भावाच्या काळात दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान नुकताच रावे ग्रामस्थ मंडळातर्फे करण्यात आला. श्री रायबादेवी मंदिराच्या भव्य प्रांगणात संपन्न झालेल्या सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित होते.

रावे गावात कोरोना काळापासून आजवर अनेक कोरोना योध्दांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन आरोग्य सेवेवर विशेष लक्ष दिले आहे. यामध्ये डाॕक्टर, आशा वर्कर्स, मेडिकल विभाग यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. या दरम्यान या देवदूतांनी कोरोना बाधितांना योग्य ती सेवा पुरवत आपले कर्तव्य यशस्वीरित्या पार पाडले आहे.

यामध्ये डॉ. संचित गावंड, डाॕ. मेघा पाटील, डाॕ. प्रितम पाटील, डाॕ. दिपक विश्वास, त्याचबरोबर श्री रायबादेवी मेडिकल स्टोअर्सचे मालक गजानन पाटील, आशा वर्कर्स पुष्पलता पाटील, संगिता पाटील, दिपू पाटील, अमृता पाटील यांनी अविरत सेवा करत समाजसेवा केली आहे. अशा कोरोना योध्दांच्या कार्याची दखल घेत समस्त रावे ग्रामस्थांच्यावतीने या कोरोना योध्द्यांचा विशेष सत्कार दसऱ्याचे औचित्य साधून करण्यात आला.

यावेळी गाव पंच कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंदन पाटील, माजी अध्यक्ष संतोष पाटील, राजा पाटील, मनोहर टावरी, हिरामण पाटील, धनाजी पाटील, जनार्दन पाटील, गजानन पाटील, सत्यवान पाटील, प्रभाकर पाटील, निवृत्ती पाटील, नितीन पाटील, धनाजी पाटील, विश्वनाथ पाटील, राना पाटील, गजानन पाटील, सुरेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण पाटील यांनी केले. यावेळी रावे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे उपाध्यक्ष तथा रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील यांचा ग्रामस्थ मंडळ रावे यांच्यावतीने नुकताच विशेष सत्कार गाव पंच कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंदन पाटील व माजी अध्यक्ष संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.