Press "Enter" to skip to content

ढोकशेत येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷

सुधागड तालुक्यातील परळी विभागातील ढोकशेत येथे 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्व पटवून देत आठवड्याच्या प्रत्येक रविवारी,,, बुद्ध पूजा,वंदना, धम्म संस्कारावर आधारित कार्यक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

अशोका विजयादशमी हा अखंड भारत देशातील बौद्ध बांधवांच्या, आयुष्यातील भाग्याचा सोनेरी परिवर्तन दिन मानला जातो. याच दिवशी महाकरूनिक शांतिदुत तथागत, भगवान गौतम बुद्धाच्या विज्ञान्नवादी, धम्माचा स्वीकार करून ,महामानव डॉ, बाबासाहेब आंबेडकरांनी, आपल्या लाखो बांधवाना नागपूर या, नागभूमीत दीक्षा दिली!आणि खऱ्या अर्थाने पहिले धम्म चक्र परिवर्तन केले.

विजयादशमी दिनी ! 64 व्या धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्त समतानगर ढोकशेत, येथे विहारात कार्यक्रम आनंदात, आणि उत्साहात संपन्न झाला. विधी संचालक, बौद्धचार्य, आयु, राजेश गायकवाड ,हे सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 22 प्रतिज्ञा पठण केल्या, आणि धम्माच्या नियमानुसार विधी पूजा पाठ घेण्यात आला. आणि या दिनाचे महत्व काय? हे जाणून घेण्यात आले. आणि नंतर गोड कार्यक्रमानिमित्त, लाडू वाटप करून, तोंड गोड करण्यात आले, या दिवसाचे महत्व सुशील गायकवाड , बौद्धचार्य , राजेश गायकवाड, राहुल गायकवाड यांनी विशद केले. या कार्यक्रमास धम्मबांधव, भीमअनुयायी उपस्थीत होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.