सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔶🔷
शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरणारे कृषी विधेयक केंद्र सरकारने मंजूर केले आहे. हे विधेयक मागे घेण्यासाठी कर्जत तालुका काँग्रेस कमिटीने शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कर्जत आमराई येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
कर्जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकेश तुकाराम सुर्वे यांनी उपस्थितांचे स्वागत करून 'केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांना देशोधडीला लावील. ते विधेयक मागे घेण्यासाठी काँग्रेसच्या वतीने विविध आंदोलने करण्यात येत असून शेतकऱ्यांची सह्यांची मोहीम हा ही त्यातीलच एक भाग आहे. गावो गावी जाऊन शेतकऱ्यांना या विधेयकाचा काय गंभीर परिणाम होईल ते समजावून सांगून त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येणार आहेत.' असे स्पष्ट केले.
माजी सरपंच व प्रगतशील शेतकरी भीमराव जाधव यांनी आपली स्वाक्षरी करून मोहोमेचा शुभारंभ केला याप्रसंगी माजी नगराध्यक्ष धनंजयजी चाचड, तालुका उपाध्यक्ष संदीप पाटील, शहराध्यक्ष ईरफान आत्तार आदी उपस्थित होते. त्यांनतर कार्यकर्त्यांना विभागवार जाऊन शेतकरी बांधवांशी संपर्क साधण्याचा सूचना देण्यात आल्या. 31 ऑक्टोबर रोजी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे. तो पर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या सह्या घेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
‘कृषी विधेयक मागे घेई पर्यंत आपण सर्वांनी एकत्रित पणे लढा दिल्यास व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी केल्यास केंद्र सरकारला हे विधेयक मागे घ्यायला लागेल.
—- मुकेश सुर्वे, अध्यक्ष कर्जत तालुका काँग्रेस








Be First to Comment