सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔷🔶🔷
देशातील शेतकरी आणि कामगार यांच्यावर अन्याय कारक असणारा कामगार विधेयक सरकारने रद्द करावा अशी मागणी पेण काॅग्रेसच्या वतीने करण्यात आली असून या करीता लवकरच तालुक्यात पत्रक वाटप करून सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे.
पेण तालुका काॅग्रेस पक्षाच्या वतीने नुकतेच गांधी मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत बोलतांना काॅग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय महिला समन्वय नंदा म्हात्रे म्हणाल्या की या देशात 60 टक्के जनता ही शेतकरी आहे त्यामुळे जवळपास 250 शेतकरी संघटनांनी या विधेयकाला विरोध दर्शविला आहे.काॅग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संपूर्ण पेण तालुक्यातील गावोगावी जाऊन या विधेयकाच्या विरोधात नागरिकांना पत्रक वाटून तसेच सह्यांची मोहीम राबविणार आहोत त्यामुळे शेतकरी आणि कामगारांसाठी मोदी सरकारने आणलेला विधेयक तात्काळ रद्द करावा अशी मागणी या बैठकीत करण्यात आली आहे.
यावेळी काॅग्रेस किसान मोर्चाच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी सुर्यकांत पाटील यांची निवड झाल्याने त्यांचे उपस्थित कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.या बैठकीला अशोक मोकल, निलेश पाटील, विजय पाटील, चंद्रकांत भगत, जयराम डंगर,प्रकाश मोकल, हिद्दाय्यततुला कुवारे, संदिप पाटील, राजू पाटील आदींसह काॅग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.







Be First to Comment