Press "Enter" to skip to content

RR च्या प्ले ऑफ प्रवेशाचा आशा जिवंत

 १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan Royals) संघ बलाढ्य मुंबई इंडियन्ससमोर ( Mumbai Indians) गुडघे टेकेल असाच सर्वांचा अंदाज होता. पण, निराशाजनक सुरुवातीनंतरही बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन यांनी तुफान फटकेबाजी करून RRला विजय मिळवून दिला. आतापर्यंत MIचे गोलंदाज हे यंदाच्या Indian Premier League ( IPL 2020) सर्वात तगडे मानले जात होते, परंतु काल त्यांना RRच्या या दोन फलंदाजांनी जमिनीवर आणले

राजस्थान रॉयल्सनं हा सामना ८ विकेट राखून जिंकला. बेन स्टोक्सनं शतकी खेळी केली. हार्दिक पांड्यानं तुफान फटकेबाजी करून मुंबई इंडियन्सचा विजयाचा पाया रचला होता, परंतु त्याच्या त्या अयशस्वी प्रयत्नानं सामना फिरला असता.

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला ( MI) क्विंटन डी’कॉकच्या रुपानं मोठा धक्का बसला. पण, इशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी ८३ धावांची भागीदारी करून डाव सावरला. मुंबई इंडियन्स जेमतेम १७० धावांपर्यंत पोहोचेल असे वाटत होते, परंतु हार्दिक पांड्या व सौरभ तिवारी यांनी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना धु धु धुतले. त्यांनी ३१ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली. पहिल्या ९ चेंडूंत केवळ ८ धावा करणाऱ्या हार्दिकनं नंतर गिअर बदलला आणि पुढील १२ चेंडूंत ५२ धावा चोपून काढल्या. हार्दिकच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं ५ बाद १९५ धावा चोपल्या. मुंबई इंडियन्सनं अखेरच्या पाच षटकांत १ विकेटच्या मोबदल्यात ७९ धावा केल्या. हार्दिकनं २१ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह नाबाद ६० धावा चोपल्या.

प्रत्युत्तरात रॉबिन उथप्पा ( १३) दुसऱ्याच षटकात माघारी परतला. कर्णधार स्टीव्हन स्मिथ ( ११)चा जेम्स पॅटिन्सननं त्रिफळा उडवला. बेन स्टोक्सनं आणि संजू सॅमसन यांनी मुंबईच्या गोलंदाजांची पीसे उपटली. स्टोक्स-सॅमसननं नाबाद १५२ धावांची भागीदारी करून राजस्थानला १८.२ षटकांत २ बाद १९६ धावा करून विजय मिळवून दिला. स्टोक्सन ६० चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १०७ धावांवर, तर सॅमसन ३१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर नाबाद राहिला.

सहाव्या षटकातच स्टोक्स माघारी परतला असता…
डावाच्या सहाव्या षटकात बेन स्टोक्स झेलबाद होऊन माघारी परतला असता. कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर स्टोक्सनं खणखणीत फटका मारला. डीप मिडविकेटच्या दिशेनं उत्तुंग उडालेला चेंडू टिपण्यासाठी हार्दिक पांड्या धावला. त्यानं डाईव्हही मारली, परंतु त्याला झेल टिपता आला नाही आणि चेंडू चौकार गेला. त्यावेळी स्टोक्स २६ धावांवर होता. हार्दिकनं तो झेल घेतला असता तर मुंबई इंडियन्सवर पराभूत होण्याची वेळ कदाचित आली नसती

Csk जिंकली,पण प्ले ऑफ प्रवेश आशा नाहीच

चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) आयपीएलच्या इतिहासात प्रथमच प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले. चेन्नईनं आयपीएलच्या १० मोसमात प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. त्यापैकी २०१०, २०११ व २०१८ मध्ये तर त्यांनी जेतेपदाचा चषक उंचावला. २०१२, २०१३, २०१५ आणि २०१९मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अशा यशस्वी संघाला २०२०मध्ये प्ले ऑफमध्ये प्रवेश करता न येणं, हे धक्कादायक आहे. Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात CSKकडून चुका झाल्या.

दरम्यान, रविवारी चेन्नई सुपर किंग्समधील ( Chennai Super Kings) स्पार्क अखेर पाहायला मिळाला. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायुडू यांनी दमदार खेळ करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Banglore) संघाला पराभूत केले. ऋतुराजच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईनं हा सामना ८ विकेट्स राखून जिंकला. RCBनं २० षटकांत ६ बाद १४५ धावा केल्या. CSKकडून सॅम कुरननं १९ धावांत ३, तर दीपक चहरनं दोन विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात फॅफ ड्यू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी चेन्नईला ४६ धावांची सलामी मिळवून दिली. ख्रिस मॉरिसनं सहाव्या षटकात १३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २५ धावा करणाऱ्या फॅफला बाद केले. संयमी खेळ करताना ऋतुराजनं अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूसह दुसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. रायुडू २७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३९ धावांवर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. ऋतुराजनं ४२ चेंडूंत आयपीएलमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. ऋतुराजनं ५१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार खेचून नाबाद ६५ धावा केल्या, तर महेंद्रसिंग धोनी १९ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईनं १८.४ षटकांत २ बाद १५० धावा करून सामना जिंकला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.