श्रीनिवास काजरेकर
नवीन पनवेल दि.२६ः
नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या ई-लर्निंग डिजिटल क्लासरूम चा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला हिंदुस्तान ऑर्गेनिक केमिकल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुबोध भिडे, भारत विकास परिषद पनवेलचे अध्यक्ष गिरिश समुद्र, ज्युपिटर डायकेम चे संचालक सी. चेलप्पन, महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्त्रबुद्धे, शाळा समिती अध्यक्ष विजय भालेराव, शाळा समिती महामात्र अतुल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. गिरीष समुद्र यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सुबोध भिडे यांनी व्हर्च्युअल दीपप्रज्वलन व संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन केले. त्यानंतर सी.चेलप्पन यांनी डिजिटल क्लासरूमचे व्हर्च्युअल उध्दघाटन केले. विद्यालयातील सहा.शिक्षिका प्रीती धोपाटे यांनी पहिला डेमो लेसन घेतला. व्यासपिठीय कार्यक्रमात प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा परिचय करून दिला.माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच विद्यालयाच्या ई – सवांद व ई रिफ्लेक्शन या डिजिटल पाक्षिकांचे मान्यवरांच्या हस्ते झाले.
ज्युपिटर डायकेमचे
व्यवस्थापकीय भागीदार रमेश चोखानि यांच्यामुळे डिजिटल स्कुल चे स्वप्न साकार झाले. या उद्योग समूहाच्या सीएसआर अंतर्गत, विद्यालयाच्या वीस खोल्या या डिजिटल क्लासरूम म्हणून सजल्या आहेत. विद्यालयातील इंग्रजी व मराठी या दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे मराठी माध्यमातील सर्व वर्गखोल्या डिजिटल असणारी पनवेल परिसरातील ही एकमेव डिजिटल हायटेक असणारी पहिली वहिली शाळा म्हणून पनवेल परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण Youtube व Facebook च्या माध्यमातून करण्यात आले. या कार्यक्रमास शाळेचे हितचिंतक व स्नेही उपस्थित होते. शिक्षिका स्वाती बापट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले विजय भालेराव यांनी आभारप्रदर्माशन केले. तसेच या ई – क्लासरूमचा उपयोग हा पुस्तकांच्या पलिकडील ज्ञान आत्मसात करण्यासाठी होईल याची ग्वाही दिली . विद्यालयाच्या लिपिक उमा इनामदार यांच्या पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.







Be First to Comment