Press "Enter" to skip to content

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते सिनियर क्रिकेट क्लब च्या नवीन हंगामाचे उद्घाटन

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते सिनियर क्रिकेट क्लब च्या नवीन हंगामाचे उद्घाटन

सिटी बेल लाईव्ह/ पनवेल.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा अर्थात विजयादशमी. आजच्या दिवशी चांगल्या कामांना प्रारंभ करण्याची प्रथा आहे. या प्रथेनुसार पनवेल मधील सिनियर क्रिकेट क्लब च्या खेळाडूंनी नूतन हंगामाची सुरुवात केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्रीफळ वाढवून  व नंतर चौफेर फटकेबाजी करत सिनियर क्रिकेट क्लबच्या या हंगामाची सुरुवात केली.
यावेळी क्लबच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे फुलांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.
समाजातील विविध स्तरांतील ज्येष्ठ खेळाडू एकत्र येत एच ओ सी कॉलनी येथील तालुका क्रीडा केंद्राच्या मैदानावर सराव करत असतात. या उद्घाटन सोहळ्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिनियर क्रिकेट क्लबच्या खेळाडूंना यशस्वी हंगामासाठी शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटन सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नगरसेवक नितीन पाटील, डॉक्टर ययाती गांधी,माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला,डॉ नितीन पोवळे, डॉ रवींद्र राऊत,उद्योजक संजय पाटकर, ए के म्हात्रे, एड.वाडकर,संकेत पवळ,सागर ठाकूर,कर्णधार प्रदीप पाटील,उपकर्णधार सुभाष पाटील,प्रफुल्ल पेंडसे, अप्पू कुंभार,विजय पाटील,रवी घाडगे,केदार माने,सागर अटवणे, त्रिशूल म्हात्रे,सुहास देशमुख,पाटेकर आदी संघ सदस्य उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.