Press "Enter" to skip to content

विजयादशमीनिमित्त जर्नालिस्ट क्रिकेट क्लब च्या नवीन हंगामाची सुरुवात

पनवेल मधील क्रिकेट खेळणाऱ्या पत्रकारांच्या संघाच्या नवीन हंगामाची सुरुवात विजयादशमीच्या निमित्ताने करण्यात आली.ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक संदीप किट्टे यांनी श्रीफळ वाढवून या वर्षीच्या हंगामाचे उद्घाटन केले. यावेळी परिवहन विभागाचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुनील जठार  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
       माधव पाटील यांच्या सह उपस्थित मान्यवरांनी क्रिकेट खेळणाऱ्या पत्रकार बांधवांना यशस्वी हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी च्या आवारा मधील कॅप क्लब येथे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी माधव पाटील म्हणाले की समाजाचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांनी स्वतःच्या फिटनेस साठी व छंद जोपासण्यासाठी देखील वेळ दिला पाहिजे.दिवसभराच्या व्यस्त शेड्युलमध्ये स्वतःसाठी काही तास काढल्याने आपले काम पुन्हा जोमाने करण्यासाठी एक प्रकारे ऊर्जा मिळते. म्हणूनच पत्रकार बांधवांनी स्वतःचा क्रिकेट क्लब बनवून यायोगे फिटनेस व खेळ या दोन्ही कडे लक्ष केंद्रित केल्याचे समजताच मला समाधान वाटले.क्रिकेट क्लब च्या सर्व पत्रकार बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो व वेळोवेळी माझे सहकार्य तुम्हास लाभेल असे आश्वासन देतो.
      यावेळी मान्यवरांच्या सह रत्नाकर पाटील, मंदार दोंदे, संजय कदम, केवल महाडिक, राज भंडारी, एड. मनोहर सचदेव,शैलेश चव्हाण आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.