प्रशासनाचा खोटा दिखाऊपणा : नागरिकांमध्ये संताप 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा । 🔷🔶🔷
खालापूर तालुक्यातील अतिशय चर्चेत असणाऱ्या खारपाडा रस्त्यावरील इसांबा फाटा सावरोली ते वडगाव वाशीवली रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्याने अनेक निवेदन आंदोलन आदी कुरापत्या कराव्या लागल्या.
मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याच्या नूतनीकरणाला सुरुवात केली जाईल असे सा.बा.वि.पनवेल अभियंता सतीश श्रावगे यांनी डिसेंबर मध्ये पाहणीच्या दरम्यान आश्वासन दिले होते. त्यानुसार मे 2019 मध्ये महिन्यात दोन टप्प्यात पूर्ण करन्यात आल्याने रिलायन्स गेट ते सावरोली चार फाटा पर्यत डांबरीकरण अंतिम टप्प्यात आले व इसाबाफाटा ते सावरोली चार फाटा हे अंतर काँक्रेटीकरण करण्यात आले. मात्र मधले काही स्पॉट डांबरीकरण केल्याने पावसाच्या सरी मुले काही ठिकाणी खड्डे पडले.
त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुसज्ज रस्त्यावर ही धोक्याचा झाला त्यानंतर नागरिकांच्या पाठपुराव्या मुले तात्पुरते काही खड्डे भरण्याचा दिखावा केला मात्र चारफाटा येथील भला मोठा खड्डयासह अन्य ठिकाणी जौसे थे च असताना काही मंडळी चे हात ओले करून सुसज्ज काम।केल्याचा दिखावा प्रशासनाने केला असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
सावरोलीे चार फाटा ते वाशिवली पर्यंतच्या रस्त्यावर ही मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने येथील प्रवास धोक्याचा झाला होता .या रस्ताबाबत तक्रारी वाढत असल्याने या रस्त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाचे पनवेल अधिकारी सावर्गे कर्जत अधिकारी अजयकुमार सर्वगोड यांनी 7 नोहेंबर 2019 मध्ये भेट देऊन पाहणी केली.
या दरम्यान खराब रस्ता का होतय काय कारणे आहेत या संदर्भात प्रत्येक स्पॉट वर पाहणी करताना ज्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने याबाबत पाहणी करताना पाण्याच्या साठ्याच्या मुले नऊ ठिकाणी रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून सर्वाधिक खड्डे इसांबा फाटा ते सावरोली चार फाटा या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने या रस्त्याचे कॉंक्रेटीकरण होणे महत्वाचे आहे.
या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाने दिली होती त्यानंतरही मधल्या काळात स्थानिक विरुद्ध प्रशानस असा संघर्ष ही झाल्याने या रस्त्याचा कामाला सुरुवात करून डांबरीकरणाचा भाग पहिला टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यातील काँक्रेटिकन करण्यात आले मात्र यातील काही भाग डांबरीकरण केले 2020 मध्ये झालेल्या पावसात या ठिकाणी खड्डे पडले त्यामुळे नागरीकांचा प्रवास धोक्याचा झाला आहे.
मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशानुसार ठेकेदाराने तात्पुरती डागडुजी केली मात्र मोठमोठे खड्डे जैसे थे च असल्याने काही न हाताशी धरून रस्ता सुखकर केल्याचा आभास निर्माण केल्याने या विरोधात नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
सावरोली खारपाडा रस्त्याच्या नूतनीकरणात 2019 मध्ये करण्यात आले पहिला टप्पा डांबरीकरण व सावरोली इसांबा फाटा हा टप्पा कॉंक्रेटीकरण करण्यात आले मात्र यातील ही काही भाग डांबरीकरण करून भरण्यात आले मात्र नुकताच झालेल्या पावसात येथील भाग खराब झाल्याने नागरिकांच्या रेठ्या मुळे तात्पुरते खड्डे भरल्याचा दिखावा केला असला तरी या भागावर सावरोली चार फाट्यावर भला मोठा खड्डा जैसे थे च असल्याने या ठिकाणी वाहने आपटून अपघात होत असताना काही मंडळींना चरिमिरी देऊन योग्य काम।केल्याचा दाखला घेत असल्याने संताप व्यक्त होत आहे
सावरोली खरपाडा मार्गावरील रस्त्याच्या रस्त्याने गेले अनेक वर्षे हैराण असल्याने या मार्गावरील प्रवास धोक्याचा झाला होता त्यामुळे नागरिकांच्या संघर्षानंतर रस्त्याचे दोन टप्प्यात काम।पूर्ण झाले मात्र काही स्पॉट डांबरीकरण केल्याने पावसाच्या पाण्यामुळे मोठमोठे खड्डे पडल्याने या मार्गावर दिवसागणिक अपघाताच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे चार फाट्यावरील अर्धवट काम पूर्ण करून या खड्डयासह अन्य खड्डे भरावेत व पुढील अपघाताची समस्या दूर करावी
अमर वादळ - ग्राम पंचायत सदस्य सावरोली








Be First to Comment