Press "Enter" to skip to content

सरकारने सर्पमित्रांना विम्याचे संरक्षण द्यावे नागरिकांची मागणी

सर्पमित्र प्रथमेश म्हात्रे यांनी शेणे येथे 8 फुट लांबीचा अजगर पकडला 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔷🔶🔷

पेण तालुक्यातील पुर्व विभागात शेणे येथील खामकर यांच्या पोल्ट्री फार्मवर आज भल्यामोठ्या आजाराने अनेक कोबंड्या फस्त केल्या असल्याची माहिती सर्पमित्र प्रथमेश म्हात्रे याला मिळाली असता त्यांनी तात्काळ त्याठिकाणी जाऊन अजगर जातीच्या सापाला व्यवस्थीत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले.

पकडलेला अजगर गागोदे खिंडत सुखरुपपणे सोडण्यात आला तो क्षण

वनविभाग पेणचे वनपाल के.जी.चौधरी, वनरक्षक सोनाली गंगाधर वाळके, एस.बी उगले यांच्या समक्ष अजगर जातीच्या सापाची लांबी मोजली असता 8 फूट लांब व 14 किलो वजनाचा असणारा हा अवाढव्य अजगर जातीचा साप प्रथमेश यांनी गागोदे खिंडत सुखरुपपणे सोडण्यात आला.

सर्पमित्र प्रथमेश म्हात्रे यांनी आजवर अनेक जातींचे सर्प पकडून त्यांना सुखरूप सोडले आहेत राज्य सरकारने अशा सर्पमित्रांना विम्याचे संरक्षण द्यावे अशी मागणी नागरीक करीत आहेत.  

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.